विवीध सेवाभावी व आध्यात्मिक उपक्रमांनी श्री सत्य साईं बाबाचा जन्मोत्सव उत्साहात बाजरा

0

🔥विवीध सेवाभावी व आध्यात्मिक उपक्रमांनी श्री सत्य साईं बाबाचा जन्मोत्सव उत्साहात बाजरा

 भिडी,प्रतीनीधी(राजू वाटाणे)-/ स्थानीक सत्य साईं सेवा समितीच्या वतिने श्री सत्य साईं बाबांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा विवीध आध्यात्मिक,सामाजिक ,सां – स्कृतिक , व सेवाभावी साप्ताहीक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करन्यात आला या सोहळ्यात संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते 

    येथिल सत्य साईं सेवा सेंटर मंध्ये साईं सेवा समितीच्या वतिने १७ नोव्हेंबर ला कलेश स्थापना ,गणपती अभिषेक व सर्व धर्म ध्वजा रोहण करण्यात आले या साप्ताहीक जन्मोत्सव सोहळ्यात स्वच्छता अभियान,परिक्षेत्रातील ग्राम खेड्यायावरील नारायण सेवा ,जागतिक महिला दिवसा निमीत्य महिला भजण ,हळदी कूंकू ,महीला सांस्कृतिक कार्यक्रम व दरोरोज साईं भजण संध्या यात विवीध भजणी कार्यक्रम,स्थानिक ग्रामिण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.राहील शेख यांच्या उपस्थितीत रूग्णाना फळ वाटप ,२२ नोव्हेंबर ला जन्मोत्सव सोहळ्यांची तयारी यात भवानी मातेचा गोंधळी कार्यक्रम कान्हा लाडे,दिलीप कूटे अल्लिपूर यानी सादर केला 

  सोमवार २३ नोव्हेंबर ला पहाटे ५-३० वाजता सत्य साईं बाबांचा जन्मोत्सव,यात बालविकास मूलांचा कार्यक्रम ,आरती व उपस्तित भजणी मंडळांना व साई भक्तांना चहा ,नास्त्याचे वाटप ८ वाजता साई भक्तांच्या उपस्थीतीत ह.भ.प.सूभास धोटे महाराज (गजानन महाराज सेवार्थ भिडी)मयूर डफळे ,सूभास जाधव , श्रीधर लाभे ,सचिण बिरे ,राजू वाटाणे यांच्या हस्ते पालखी पूंजन करून भजणी,ताल -मृदंगाच्या निनादात ,दिंडी पताका व साईं रामच्या जयघोषनांनी पालकी सोहळा गावाच्या प्रमूख मार्गाने मार्गक्रमण करूण १-३० वाजता सत्य साईं सेवा सेंटर वर समारोह कार्यक्रम यात उपस्थित भजणी मंडळांना मानपान देवून सन्मानित करण्यात आले व महाप्रसाद देवून या जन्मोत्सव ची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!