श्री संत योगी भिकुजी महाराज यांच्या डोक्याची मालिश करत समीर देशमुख यांनी केली सेवा..

0

           वर्धा : आष्टा (वडाळा), ता. धामणगाव, जि. अमरावती येथे श्री संत योगी भिकुजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दि. 22 जानेवारी 2024 ते 29 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी काकडा आरती, श्री ची आरती, भजन, संगीतमय भागवत, हरिपाठ असे विविध कार्यक्रम सुरू आहे. त्याच निमित्त श्री संत योगी भिकुजी महाराज यांची आरती करण्यासाठी समीर देशमुख उपस्थित होते. सुरूवातीला समीर देशमुख यांनी श्री संत भिकुजी महाराज यांचे चरण धुवून, अत्तर आणि चंदन लावून पूजन केले, त्यांना नवीन रजई अर्पण केली आणि त्यांच्या केसाला तेल लावून थोड्या वेळ डोक्याची मालिश करत समीर देशमुख यांनी सेवा केली.वर्धा नदीच्या काठी वसलेल्या अष्टा ( वडाळा) या छोट्याश्या गावी एक गरीब कुटुंबात 29 जनेवरी 1954 रोजी श्री संत भिकाराम महाराजांचा जन्म झाला. भिकाराम महाराज यांचा जन्म एक साधारण बाळ सारखं झाल होता. साधारणतः वायाचे 20 ते 22 व्या वर्षी त्यांचे डोक्यात वेडेपण शिरले. त्यामुळे ते जंगलों जंगली उघड्या अवस्थेत फिरायचे, कोणावरही मारायला धावायचे. त्यामुळे घरादारात व गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यांचा वर बरेच उपचार करण्यात आले परंतु काही सुधार झाला नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी झोपी मध्ये असतांना त्यांच्या हाथा पायात बेड्या टाकल्या. काही दिवसानंतर त्यांचे स्वभावात शांतता आली. अनेक लोकांना त्यांचा अनुभव यायला लागला. त्यांची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती त्यामुळे गावकर्‍यांनी तब्बल 12 वर्षा नंतर त्यांच्या बेड्या काढल्या. आज बेड्या काढून 19 ते 20 वर्ष होत आहे. अजुनही त्यांनी पाठी मागचे गाव पाहिले नाही. स्नान केले नाही, दात घासले नाहीत, जेवनाचे हात सुध्दा धूतले नाही. पूर्णपणे त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली आहे. मागील चौदा, पंधरा वर्षापासून गावकरी 22 जानेवारी ते 29 जानेवारी या काळात दरवर्षी जन्म उत्सव साजरा करतात. 29 जानेवारीला भव्य महाप्रसाद असतो. पूर्णपणे निर्मळ वैराग्य अवस्था बाबांचे ठिकाणी प्राप्त झाली. त्यामुळे बाबाचे बोलतील ते अमृत वचन आहे. आतापर्यंत अनेकांच्या पारंपरिक अडचणी बाबांनी सोडवल्या आहेत। दररोज १००० ते १५०० भाविक दर्शनास येत आहेत. दिवसे दिवसेंदिवस बाबांचे प्रस्थ वाढत असल्याचे मत समीर देशमुख यांनी व्यक्त केले.

साहसिक न्यूज /24वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!