समुद्रपूर तालुक्यात रेतीमाफिया झाले गब्बर.
समुद्रपुर.: तालुक्याच्या वना नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे. ग्रामीण भागातील नदी पात्रात दरोज वाळू उपसा केला जात आहे. नदी पात्रातील मातीमिश्रीत वाळूचा ऊपसा झाल्याने नदीपात्रात प्रचंड खड्डे पडले आहेत. महसुल प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करुनही कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट महसूली प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे.वाळू माफियांकडून दररोज जेसीबी व इतर साधनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे.वाकसूर, खुनी, उमरा-औरंगपूर रिठ, चाकूर व पारडी कानकाटी, निरगुडी, बरबडी, शेडगाव, माणगाव, मेनखात , माडगाव, या सर्व नदी पात्रातुन मोठ्या प्रमाणात वाळूची दररोज वाहतूक केली जाते.तालुक्यातील वाळू ही चढ्या भावात ग्राहकांना विकली जाते. वर्षभर अशा गौण खनिजाचा अवैध उपसा सुरु राहिल्याने त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.नदी पात्रातून वाळू उपसा सर्रास सुरू असून त्यामुळे नदी काठच्या भुगर्भातील पाणी पातळी खालवली आहे.समुद्रपूर तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा होत असलेबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत आहे, मात्र महसूल, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासन या बेकायदेशीर वाळू उपशाकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट