सर्पमित्र रोहित भादीकर यांना”द रिअल हिरो अवॉर्ड” पुरस्काराने सन्मानित
साहसिक न्युज24
देवळी /सागर झोरे:
देवळी शहरातील प्रसिद्ध सर्पमित्र रोहित भादीकर यांना द रियल हिरो अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जगविख्यात असलेले सर्प तज्ञ नीलंबकुमार खैरे यांच्या जन्मदिवसानिमित्त द रियल हिरो अवॉर्ड” हा सन्मान सोहळा हिंगोली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात संपूर्ण महाराष्ट्राचे विविध ठिकठिकाणाहून आलेले, जे वन्यजीवांच्या मदतीला धावून येते निस्वार्थपणे काम करणाऱ्या लोकांचा द रियल हिरो अवॉर्ड 2022″ अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला.
सर्पमित्र रोहित भादिकार हे देवळी तालुक्यात मागील अनेक वर्षापासून सर्पनां जीवनदान देण्याचे निस्वार्थपणे कार्य करीत आहे दिवस रात्र ते आपला जीव धोक्यात टाकून वन्यजीवांची निषार्थ सेवा करीत आहे त्यांच्या या कार्यामुळे वर्धा जिल्ह्यातील एकमेव सर्पमित्र म्हणून त्यांना द रियल हिरो अवॉर्ड हा पुरस्कार देण्यात आला आहे. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यामध्ये शुभम चौधरी, प्रतीक खत्री, यश काळे, यश घोडमारे, करण खोडके, त्यांना शुभेच्छा दिल्यात.