सावंगीच्या युवकाचा शेगाव (गोटाडे) शिवारात आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट
Byसाहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
सावंगी गावातील एका 35 वर्षीय युवकांचा मृतदेह शेगाव गोटाळे शिवारात आढळून आला.समुद्रपूर तालुक्यातील शेगाव गोटाडे या गावातील गंगाबाई आडे यांच्या शेता लगत मृतदेह आढळून आला. मृतकाचे राजू नगराळे राहणार सावंगी असे नावं असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक राजू नगराळे नियमित दारू पित होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती पोलीस पाटील समीर धोटे यांनी पोलिसांना दिली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहे