सावंगीत अज्ञात वाहनाच्या धडकेत वयोव्रु्ध्द इसम ठार

0

वर्धा / क्राईम प्रतिनिधी :

रस्‍त्‍याने जात असलेल्‍या ७० वर्षीय वृद्धास अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सूमारास वर्धा यवतमाळ महामार्गावर पुनर्वसन नेरी परिसरात घडली.
सुखदेव नाखले वय ७० रा. सालोड हिरापूर पुनर्वसन नेरी असे मृतक वद्धाचे नाव आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्यात आला आहे.
सुखदेव नाखले हे बकऱ्या चराईसाठी गावाजवळच्या पडीक शेतात घेऊन गेले होते. बकऱ्या घेऊन रस्‍ता ओलांडत असताना अज्ञात ट्रक चालकाने चिरडल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच ट्रकचालकाने घटना स्‍थळावरुन पळ काढला. अपघात ऐवढा भीषण होता की, अर्ध शरीराचा पुर्णतः चेंदामेंदा झाला होता. घटनास्‍थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची सांवगी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्‍हा रुग्‍णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला असून सावंगी पोलिस तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!