साहेबांची “बदली” ची संधी साधत ‘खत्री’ गल्लीचे उद्घाटन…!

0

पंकज तायडे/ मुक्ताईनगर:
मुक्ताईनगर शहरामध्ये परिवर्तन चौका लगतच असलेल्या ब्रहानपूर रस्त्यावर ज्या हात गाड्या लागलेल्या आहे त्यामध्ये हात गाड्या वरती टपरी तयार करून मटका चे दुकान थाटलेले आहे नेमका मटका चालू होण्यामागचे कारण काय राजकीय वरदहस्त असल्याचा नागरिकांचा आरोप होत आहे.
मुक्ताईनगर शहरामध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात आहेतच परंतु शहराच्या मधोमध खत्री गल्ली बसलेली आहे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे मध्यंतरी भ्रमणध्वनीद्वारे व चोरीचोरीचुपकेचुपके असा प्रकार चालू होता परंतु आता खुलेआम सट्टा मटका घेतला जात आहे.
 नेमके आता अभय तरी  कोण देत आहे प्रशासन की राजकीय वर्तुळातून हातभर या प्रकाराला लागत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत असे जर रोजच चालू असले तर लहान लहान मुलाचे भविष्य धोक्यातच असणार असून लहान मुले चोरीच्या वळनाकडे वळणार आपण थांबू शकत नाही यातून मोठा प्रकार सुद्धा गुन्ह्या सारखा घडू शकतो डॉक्टर विवेक सोनवणे यांच्या दवाखान्याजवळ व समोरील भागात सट्टा व मटका याचे मोठमोठे दुकान थाटून बसलेले असतात व आता ऍपेरिक्षा मध्ये सुद्धा सट्टा मटका घेतला जात आहे याकडे पोलिस प्रशासन लक्ष देतील का असा प्रश्न लहान असलेल्या पालक वर्गामध्ये होत आहे एवढे जर खुलेआम सट्टा चालू असला तर स्थानिक पोलिस प्रशासन करतात तरी काय यात आर्थिक हितसंबंध तर जोपासला जात नाही ना असाही प्रश्न स्थानिक उपस्तीत करून नागरिक चर्चा करत आहे मागील काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळातून अवैध धंद्या बाबत आरोप-प्रत्यारोप होतांना दिसून आले तर स्थानिक व एलसीबी यांनी कारवाई केली परंतु नाशिक विभागीय आईजी यांच्या पथकाने सुद्धा पीडी चालक पालक यांच्यावर गुन्हे दाखल करून संपूर्ण सट्टा हा बंद स्वरूपात केला होता परंतु लागलीच सट्टा मटका चालू होण्याचे कारण देखील गुलदस्त्यातच बंद स्वरूपात आहे आताही आई जी पथकामार्फत कारवाई होईल का की राजकीय वर्तुळातूनच आवाज उठवला गेल्यावर कारवाई होईल याकडे स्थानिक आमदार यांनीही व राज्याचे गृहमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मुक्ताईनगर वासीय नागरिक बोलत आहे  
एखादी हात मजूर व्यक्ती जर दोनशे रुपयांपासून हजार रुपये पर्यंत किंवा लाखो रुपये पर्यंत सट्टा लावत आहे तर मुक्ताईनगर शहरामध्ये सट्टा खेळणारे प्रेमी किती असतील व किती लाखो रुपयांचा रोजचा गोरख व्यवसाय हा चालत आहे यातून सिद्ध होत आहे दिवसातून चार वेळा सत्ता येतो आणि जातो असा प्रकार चालत असेल तर रोजची उलाढाल ही करोडो रुपयांची होत आहे मग हा पैसा येतो तरी कुठून याला ही मार्च इंडिंग असते का की मार्च संपला व एप्रिल ला लागलीच सट्टा मटका खुलेआम मोकळा चालू झाला तर की प्रशासनाने च हीत संबंध जोपासत चालू करण्यास परवानगी दिली आहे असे नागरिक चर्चा करत आहे 
 कित्येक संसार या मटका प्रेमी खेळत असल्या कारणाने उध्वस्त झालेले आहे बहुतांश प्रमाणात मोल मजुरी करणारच व्यक्ती हा आशेच्या मारे जमा झालेले पैसा हा मटका खेळण्यात लावत आहे व घरी जाताना खाली हात परतत असून  घरात काही मुलांना व महिलांना काही खाण्यासाठी नेले नाही आई मुलांना काय खायला देणार यातून  तर वाद निर्माण हाफ मडर  अथवा मोठा घात होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही जुनेगाव, बुऱ्हाणपूर रोड ,रोहिदास नगर च्या कोपर्या जवळ, डॉ विवेक सोनवणे यांचा दवाखान्या जवळ, गावडे कॉम्प्लेस च्या समोर ,बजरंग टी च्या जवळपास व बस स्टँड च्या भिंतीला लागून मटका खेळण्याचे प्रमाण जास्त आहे 
मटका खेळण्याचा प्रकार  कल्याण, मुबंई,मिलन ,टाईम अश्या प्रकारे खेळला जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!