सिंदी शहरातील गांधी चौकात गणतंत्र दिन उत्साहात साजरा..
🔥 हभप. प्रा.डॉ. नारायण निकम यांचाहस्ते झाले ध्वजारोहण.
🔥 माजी सैनिकांच्या पत्नी व आदर्श शिक्षिकेलाही केले सन्मानित
सिंदी (रेल्वे) : स्थानिक गांधी चौकात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वतंत्र काळापासून सर्वपक्षीय गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संतसाहित्य विचारवंत हभप. प्रा.डॉ. नारायण निकम यांचाहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, त्यांचे काँगेस कमेटीच्या वतीने शाल पुष्पहार घालून सत्कार स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील माजी सैनिकांच्या पत्नी, आदर्श शिक्षिका वर्षा गवारले यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहर काँग्रेसचे अध्यक्ष व राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य माजी नगराध्यक्ष प्रकाशचंद्र डफ होते. श्री.प्रा.डॉ. निकम यांनी प्रजासत्ताक दिनाचे व संविधानाच्या चौकटीचे महत्व सांगून लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन केले तर माजी नगराध्यक्ष प्रकाश डफ यांनी या देशातील संविधान वाचविण्यासाठी पुन्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा महाराजांच्या विचारधारेची अनुभूती अंगीकार करण्याची गरज असल्याचे विचार यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शहरातील माजी सैनिकांच्या पत्नी कौशल्या कवडूजी नरड, शोभा रामदास बारई, कुसुम मधुकर साखरकर, शकुंतला कृष्णा पेटकर, यांचा माजी नगराध्यक्षा सुनीता कलोडे, महिला काँग्रेस अध्यक्षा शालिनी तूमाने, भाजप गटनेत्या तथा माजी नगरसेविका अजया साखरे, माजी नगरसेविका जयना बोंगाडे यांच्याहस्ते शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापूर 2023, कला जीवन बहुउद्देशीय संस्था, ढगातर्फे राष्ट्रीय रत्न पुरस्कार, शिक्षक ध्येय विद्यार्थी डिजिटल ॲपतर्फे कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार, नक्षत्र साहित्य संघ नाशिक तर्फे उत्सव नवरात्रीचा जल्लोष स्त्रीशक्तीचा म्हणून नक्षत्र नवदुर्गा पुरस्कार, आदर्श शिक्षिका म्हणून नगर विद्यालयाच्या शिक्षिका वर्षा गवारले व सूरज संतोष बांगडे या तरुणाने सायकलने 5 महिने राज्यभर 6 हजार किलोमीटर फिरून 55 गड किल्ल्यांच्या अभ्यास केला व 25 जानेवारी रोजी वापसी आगमन झाले. यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
येथील पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनपीतळे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यशस्वीपणे कारकीर्द पार पाडली असल्याने त्यांचाही शाल श्रीफळ देवून सत्कार खविसचे उपाध्यक्ष ए.सी. कलोडे यांचे हस्तेकरण्यात आला, कार्यक्रमाला सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित असून स्व.रमाबाई पू. वझुरकर नगर विद्यालयातर्फे प्राचार्य विलास येखंडे व पीटीआय राजू मडावी यांनी विशेष परिश्रम घेवून लेझिम, दंबल्स सारखे नेत्रदीपक प्रत्यक्षित सादर केले. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर पंजाब सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन मोह. इकबाल इब्राहिम यांनी केले असून यावेळी भाजप अध्यक्ष ओमप्रकाश राठी, राकाचे गंगाधर कलोडे, शेतकरी संघटनेचे प्रमुख निळकंठ घवघवे, शिवसेनेचे सचिन लांबट, रिपब्लिकन पक्षाचे घनश्याम मेंढे, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर घवघवे, बाबा भुते, रमेश चंदनखेडे काँग्रेसचे अरुण झाडे, रणजित मडावी, रवी राणा, जगदीश बोरकुटे, गजानन हांडे, अशिफ हुसेन शेख, पवन चौधरी, राकेश श्रीवास्तव कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे