सिंदी शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन..
सिंदी (रेल्वे) : १७ जानेवारी, २०२४ रोजी सिंदी शहरात भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून “ विकसीत भारत संकल्प यात्रा” हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात १७ महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ज्यांना आतापर्यंत कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे. सदर योजनेत काय काय लाभ मिळू शकतात, कोण लाभार्थी होऊ शकतात, यासदंर्भात एकत्रित माहिती देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील नागरिकांना विकसित भारत संकल्प रथाला भेट देण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी यावेळी केले.नगर परिषद सिंदी कार्यालयामध्ये दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता ” विकसीत भारत संकल्प यात्रेला” हिरवी झेंडी देऊन संकल्प यात्रेचे उपस्थित मान्यवरच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी हर्षल गायकवाड, जिल्हा सह आयुक्त वर्धा, मुख्याधिकारी न.प. सिंदी, विजयकुमार आश्रमा तथा नगर परिषद सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषद क्षेत्रातील सतरा योजनाचे लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे