सूरवाडा खुर्द येथील सिंचन विहिरीचा निधी हडप केल्या प्रकरणी गजानन पाटील यांचे उपोषण

साहसिक न्यूज24
मुक्ताईनगर /पंकज तायडे :
जळगाव जिल्हातील बोदवड तालुक्यातील सुरवाडा खुर्द येथे निधी हडप करून शासनाची फसवणूक करणारे लाभार्थी यांची चौकशी करून गुन्हे दाखल करणे व निधी वसूल करणे याकरिता समाजसेवक गजानन पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे गजानन पाटील यांनी दिनांक 22 जुलै 2022 रोजी गटविकास अधिकारी यांना तक्रार देऊन ही सदरील गोष्टीची चौकशी झाली नाही, तसेच तसेच लाभार्थी यांच्यावर सुद्धा प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून उपोषणास बसल्याचे गजानन पाटील यांचे कडून सांगण्यात आले आहे यावर गटविकास अधिकारी 25 ऑगस्ट दिवसांत अहवाल देणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर पदाचा दुरुपयोग करून शासनाचा निधी हडप केल्याप्रकरणी सदर लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांना अपात्र करावे तथा शासनाची केलेली फसवणूक त्यांच्याद्वारे वरून काढण्यात यावी अशी गजानन पाटील यांची मागणी आहे.