सेलूत थांबा असतांना बसचालक वाहकाची मुजोरी कायम, जेष्ठ प्रवासी महिलेला वर्धेची तिकीट देत बायपासवर उतरून देत तिकीट हिसकावून घेतले

0

Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ सेलू : नागपूर वर्धा महामार्गावर धावणार्‍या सर्व आगाराच्या बसेसला सेलू येथे थांबा असतांना बसवाहक थांबा नसल्याचे सांगत प्रवाशांना खाली उतरवून देत त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहे तर कधी सेलूत बस न आणता नविन बायपासवर उतरून दिले जाते असाचा काहिसा प्रकार एका वयोवृद्ध महीलेच्या बाबतीत घडला नागपूर वरून सेलूला येत असलेल्या या ६८ वर्षीय महिलेला सेलूत थांबा नसल्याचे सांगत वर्धेचे तिकीट दिले आणि सेलूला बस न आणता नविन बायपासवर उतरून देत तिचेकडील तिकीट हिसकावून घेतले
नागपूर वरून वर्धा यवतमाळ जाणार्‍या राळेगाव आगाराची बस क्रमांक एम एच ४० ऐक्यू ६१३८ या बसचे वाहकाने हे कृत्य करीत मनमानी कारभाराचा कळस गाठला नागपूर येथून सुटणारी ही बस वर्धा स्थानकावर दुपारी ५ वाजून ५५ मिनिटांनी पोहचली या बसचे वाहकाची वर्तणूक चांगली नव्हती एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने या जेष्ठ नागरिक महिलेला तुमचे वय झाले फीरायचे नाही फुकटच्या सवलती लाटता अशा शब्दांत बोलून या महिलेचा चार चौघात अपमानीत करण्यास मागेपुढे पाहले नाही सेलू येथे सर्व जलद बसेसचा थांबा असतांना हा प्रकार येथे नित्याचा झाला आहे याबाबत विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे अनेदा यावरुन वाद निर्माण होत आहे याबाबत वरीष्ठाकडे गेल्यावरही न्याय मिळत नसेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी वर्धा आगार प्रमुखांचे कानावर ही बाब टाकली असता त्यांनी ही बसवाहक चालकाची बाजू घेत सेलूचे प्रवाशांना घेतल्यास त्यांना उभे न्या पहिले बसमध्ये प्रवेश द्यायचा नाही असे खडे बोल सुनावले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगतीले.
येथे विद्यार्थी तथा प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेत यास जबाबदार असणार्‍या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!