सेलूत लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ सेलू ः लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
सेलू हिंगणी मार्गावरील ईसार पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक असलेल्या घोराड येथील स्वप्नील अरूण दावेदार वय २५ वर्ष याने खरांगणा गोडे येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करत लग्नाचे आमिष दाखवून वारवांर तिचेशी शरीर संबंध स्थापित केले परंतू तिला वाऱ्यावर सोडून अवघ्या चार महिन्यापूर्वी दुसर्याच मुलीशी लग्न केले याची भनक या अल्पवयीन मुलीला लागताच या पिडीतेने सेलू पोलिसांत या तरूणाचे विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीचे अनुषंगाने सेलू पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली ठाणेदार रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक तपास सेलू पोलीस करीत आहे