हजारो तरुणांना मिळाली शस्त्रांची माहिती, वर्धा युथ फेस्ट : रोवल्या गेले देशभक्तीचे बिज.
वर्धा : विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सेवाग्राम मार्गावरील चरखा पॉइंट येथे आयोजित वर्धा युथ फेस्ट या उपक्रमात हजारो तरुणांना भारतीय सैन्याकडे असलेल्या विविध शस्त्रांची माहिती अगदी सोप्या शब्दात देण्यात आली. त्यामुळे हा उपक्रम तरुणांच्या मनात देशभक्तीचे बीज रोवण्यासाठी उपयुक्तच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरु नये.वर्धा युथ फेस्ट या उपक्रमातील एका दालनाव्दारे भारतीय सैन्य दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तरुण-तरुणी व नागरिकांना सुमारे ३५ प्रकारच्या शस्त्रांची माहिती दिली. तीन दिवसांमध्ये तब्बल तीन हजारहून अधिक व्यक्तींनी भारतीय सैन्याच्या या दालनाला भेट देत भारतीय सैन्य दलातील आधुनिक शस्त्रांची माहिती जाणून घेतली.![](https://sahasiknews.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240114-WA0346-300x169.jpg)
साहसिक न्यूज/24वर्धा