🔥अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचे सेलू पोलीसांचे निर्देश
सेलु -/ दिनांक 22/08/2026 रोजी . सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे आदेशाप्रमाणे ऑल आऊट मोहीम व नाकेबंदी दरम्यान पोलीस स्टेशन सेलू हद्दीत वाढत्या अपघातास आळा घालण्या करिता प्रभावी उपाययोजना म्हणून अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालण्यास देणारे जबाबदार पालक यांना पोलीस स्टेशनला बोलावून सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार . पंकज वाघोडे यांनी मुलांना समज देण्यात आली असून यापुढे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यात दिल्यास पालकांवर मोटार वाहन अधिनियम प्रमाणे कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सदरची कारवाई सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक सा. वर्धा, सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा, सुनिल महाडिक उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनात . पंकज वाघोडे सपोनि./ठाणेदार पो.स्टे. सेलू, पो.उपनि. उमेश उगले, पोलीस अंमलदार सुनिल चावरे, मंगेश राऊत, अनिल केकतपुरे, रामकिसन ईप्पर, गजानन कामठाणे, ओम तल्लारी, विनायक गोंडे यांनी केली.