🔥आर्वी तालुक्यात सोलर एजंटचा धूमाकूळ,डमी कंपन्यांचे सोलर साहित्य बसवून जनतेची आर्थिक लूट.
🔥जागृत नागरिकांनी मान्यताप्राप्त सोलर कंपनीचे सोलरच बसवावे.
आर्वी -/ केन्द्र आणि. राज्य सरकारच्या सौर उर्जा योजनांचा,लाभ घेण्याच्या नावाखाली,आर्वी तालुक्यात सध्या बोगस सोलर एजंटनी,चांगलाच धूमाकूळ घातला आहे. “मोफत विज” आणि “सरकारी सबसिडीचे” आमीष.दाखवून ग्रामीण भागातील आणि काही शहरी भागातील भोळ्याभाबड्या नागरिकांच्या घरावर निकुष्ठ दर्जाचे आणि डमी कंपन्याचे सोलर पँनल बसवुन त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर येत आहेत.
. वस्तुतः शासनाच्या “पीएम-सुर्यघर-मोफत-वीज योजना” अंतर्गत अनेक नागरिक सौर उर्जा संच बसवण्यास उत्सुक आहेत; नेमका याच संधीचा फायदा घेत काही अनधिकृत एजंट गावा-गावात फिरत आहेत. तसेच हे एजंट स्वतः ला सरकारी प्रतिनिधी किंवा मोठ्या कंपन्याचे अधिकुत विक्रेते असल्याचे बेमालूमपणे नागरिकांना भासवतात!प्रत्यक्षात मात्र ते नामांकित कंपन्याचे नाव सांगून नागरिकांच्या घरावर स्थानिक किंवा बनावट(Dummy)कंपन्याचे तकलादू सोलर साहित्य बसवत असल्याचे दिसून येते.
अर्थातच या बसवलेल्या सौर पँनलची कार्यक्षमता कमी असून काही दिवसातच ते खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
🔥अशीही होतेय फसवणूक; नित्कुष्ठ दर्जाचे साहित्य.
नामाई ब्रँडचे नाव सांगून प्रत्यक्षात साध्या पत्र्यासारखे दिसणारे आणि नित्कुष्ठ दर्जाचे चायनीज किंवा डमी पँनेल लावले जात आहेत. तद्वतच सबसिडी च्या नावाखाली आर्थिक लूट करीत आहेत. सबसिडी मिळवून देतो, असे मोघम आणि थातुरमातुर रित्या सांगून अडाणी नागरिकाकडुन ,वेळेप्रसंगी मोठी आगाऊ रक्कम उकळली जात आहे. अनेक ठिकाणी एजंट बनावट वारंटी कार्ड आणि बिले देऊन ग्राहकांची दिशाभूल करून भोळवण करत आहेत. तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील काही ठराविक अशिक्षित नागरिकांना अद्ययावत सोलर तंत्रज्ञानाबद्दल फारशी माहिती नसल्याने एजंट सांगतिल त्या अटीवर नागरिक विश्वास ठेवत असल्याचे दिसून येते. तसे पाहता सोलर पँनेल बसवण्यापुर्वी नागरिकांनी खालील गोष्टीची खातरजमा, शहननिशा करणे आवश्यक आहेत. केवळ सरकारच्या अधिकुत पोर्टलवर(PMSuryaghar.gov.in)नोंदणी केलेल्या कंपन्याकडून सोलर बसवून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहेत.
जो एजंट तुमच्या कडे सोलर विक्री करण्यासाठी आला आहेत, तो महावितरण किंवा शासनाच्या अद्ययावत यादीत अधिकुत विक्रेता(Registered-Vendor) आहेत का?याचीही सखोल तपासणी करावी. तसेच तुमच्या कडे सोलर साहित्य बसवल्यानंतरच पक्के जिएसटी बिल आणि कंपनीचे अधिकुत वारंटी कार्ड आवर्जूनपणे मागून घ्यावे. तसेच सरकारी सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते.त्यामुळे कोणत्याही अनधिकृत एजंटला सबसिडीच्या नावाखाली रोख रक्कम अजिबात देवू नयेत असे मला वाटते. (अविनाश ल.टाके सामाजिक कार्यकर्ते आर्वी जिल्हा. वर्धा.) आर्वी तालुक्यातील काही मोजक्या गावागावात फिरणाऱ्या या तथाकथित संशयास्पद, एजंटवर प्रशासनाने आणि कर्तव्यदक्ष पोलीस विभागाने कडक पाळत ठेवणे गरजेचे आहेत. असे माझे प्राजंळ मत आहेत. (अरुण म.कहारे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आर्वी जिल्हा.वर्धा.) माझ्या मते सोलर एजंट चा सुळसुळाट झाला आहेत, त्यामुळे जागृत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील अधिकुत सोलर. विक्रेत्यांची यादी ग्रामपंचायती मध्ये दर्शनी भागात प्रसिद्ध करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांची आणि ग्रामीण जनतेची होणारी फसवणूक थांबेल असे मला वाटते. (प्राध्यापक सुरेंद्र मु.गोठाणे आर्वी जिल्हा.वर्धा.) जर कोणताही अनधिकृत एजंट तुम्हाला कमी आणि स्वस्त पैशात सोलर बसवून देण्याचे गोड आमीष आणि प्रलोभन दाखवत असेल तर आधी त्याची अनधिकृता तपासावी आणि फसवणूक झाल्यास तातडीने थेट तक्रार करावी, असे माझे प्राजंळ. मत आहे. (राहुलभाऊ गोडबोले आर्वी भाजप शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आर्वी)
अमरावती येथील सोलर एजंट सुरेन्द्र धर्माळे या व्यक्तीने माझ्या कडून एक लाख सत्तर हजार आँनलाईन पेमेंट माझ्या कडून घेतले आहेत. परंतु अद्यापही माझ्या घरी पैसे पेड करुन ही सोलर सिस्टीम बसवली नाहीत. तसेच ५०पेक्षाही अधिक लोकांची आर्थिक फसवणूक या व्यक्तीने केलेली आहेत, अशा फ्राँड व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच माझे दिलेले पैसे मला परत मिळावे, यासाठी शासकीय यंत्रणा आणि पोलीस विभागाने मदत करावी, अशीच माझी रास्त मागणी आहेत. (प्राध्यापक उमेश रमेशराव टाके साईनगर अमरावती.)