मेमन डे विविध सामाजिक उपक्रम करून साजरा.

0

🔥मेमन डे विविध सामाजिक उपक्रम करून साजरा.

आर्णी -/ दिनांक 11 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मेमन डे म्हणून सामाजिक उपक्रमाद्वारे आल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई राष्ट्रीय अध्यक्ष हाजी इकबाल ऑफिसर यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येतो, दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आर्णी शहरातील कच्ची मेमन समाज द्वारा विविध सामाजिक उपक्रम राबवून मेमन दिवस आनंदात साजरा करण्यात आला , ज्यात प्रामुख्याने समाजद्वारा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप, शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, नागपुरे वृद्धाश्रम येथे वृद्धाना वैद्यकीय साहित्य व फळ वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आले या वेळी जमात प्रमुख हाजी शफी खाकरा (राष्ट्रीय सदस्य), हाजी युसूफ नागानी, यासिन धारिवाला, हाजी रऊफ डोसानी,जमात सचिव= इम्रान फाजलानी , शमी देलानी, आर्णी मेमन जमात अध्यक्ष= यासिन नागानी , फारुक धारिवाला, हाजी रफिक राजकोटीया, जमात उपाध्यक्ष कादर इसानी इत्यादी उपस्थित होते.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्णी यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!