🔥नवव्या राष्ट्रीय पोषण महातील मास्टर शेफ स्पर्धेत आष्टी प्रकल्पातील साहूर अंगणवाडी क्रमांक 68 प्रथम
साहुर शरद वरकड -/ नवव्या राष्ट्रीय पोषण महा अभियाना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मास्टर शेफ स्पर्धेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आष्टी प्रकल्पातील साहूर येथील अंगणवाडी क्रमांक 68 मधून शीतल निलेश लाड यांनी प्रथम क्रमांक पटकविला यामध्ये भाग घेऊन बालकांसाठी पौष्टिक व आरोग्यवर्धक पाककृती सादर केली होती सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकाची माता असलेल्या शितल लाड यांनी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा वापर करून नाविन्यपूर्वक पाककृती तयार केली होती ही स्पर्धा जिल्हास्तरीय वर्धा येथे घेण्यात आली होती यात खेळे गावातील आष्टी तालुक्यातील साहूर च्या अंगणवाडी क्रमांक 68 मधील दोन मातांनी भाग घेतला होता त्यामध्ये शितल लाड व रीना वरकड या अंगणवाडी क्रमांक 68 मधील माता असुन अंगणवाडी सेविका ज्योती गुल्हाने व बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनात या दोन मातांनी आपली पाककृती सादर केली यामधून परीक्षकांनी शितल लाड यांच्या पाककृतीला विशेष पसंती दर्शविली व जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले विशेष म्हणजे साहूर येथील अंगणवाडी क्रमांक 68 मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात यामध्ये पोषण आहार वेशभूषा इत्यादी अनेक स्पर्धेचे आयोजन येथील अंगणवाडी क्रमांक 68 मध्ये अंगणवाडी सेविका ज्योती पुंडलिक गुल्हाने व किरण ढवळे करीत असतात याचा फायदा म्हणून आज या अंगणवाडी ने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या प्रकल्पाचे नाव लौकिक केले या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांच्या हस्ते शितल लाड यांना पुरस्कार सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले शितल लाड यांच्या यशाबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी नितिन लोखंडे व अंगणवाडी सेविका ज्योती गुल्हाने यांनी त्यांचे अभिनंदन केले.