पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या शपथविधीनिमित्त सिंदी शहरात जल्लोष….

0

🔥शहरात फटाक्यांची आतिषबाजी.

🔥मिठाईचे झाले वाटप..

सिंदी रेल्वे -/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दिल्ली येथे शपथ घेतली. या शपथग्रहण सोहळ्यानिमित्त सिंदी शहर भाजपच्यावतीने गांधी व बसस्थानक चौकात मोठ्याप्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात व फटाकांची आतषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.सिंदी शहर भाजपच्या पुढाकाराने व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने शहरात रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते. या जल्लोषात सहभागी होण्यासाठी भाजपचे व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहचले होते. दरम्यान, भाजपचे भगवे झेंडे सर्वत्र फडकत होते. आकाशात जाऊन फुटणारे रंगबिरंगी फटाके सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. कार्यकर्ते गाण्याच्या तालावर थिरकत होते. सोबतच गगनभेदी घोषणा देखील सातत्याने सुरू होत्या. निकालादरम्यान भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्याने तसेच येथील भाजपचे रामदास तडस यांचा या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काहीसा अपेक्षाभंग झाला होता. त्यामुळे येथील भाजपच्या वतीने जल्लोष टाळण्यात आला होता. मात्र, रविवारी राओलाचे सरकार स्थापन झाल्यावर मात्र येथे मोठा जल्लोष करण्यात आला.पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहे. या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली होती. यामुळे मोदींच्या या शपथग्रहण सोहळ्याचा देशभर जल्लोष सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी असा जल्लोष पहायला मिळाला. या जल्लोषामध्ये भाजपचे शहर अध्यक्ष ओमप्रकाश राठी, माजी शहराध्यक्ष सुधाकर घवघवे, मनोज पेटकर, रामेश्वर घंगारे, यशवंत बडवाईक, सचिन गुल्हाने, अनिल साखळे, गजानन रोडे, रामभाऊ सोनटक्के, प्रकाश सिरसे, श्रावण झाडे, बालु, इंगळे, विलास जांबूतकर सह आदींची उपस्थिती होती.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!