पवनार सेवाग्राम नॅशनल हायवे रोड ठरतोय डोकेदुखी….

0

रोड साईड नालीच नसल्याने पावसाचे घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान..

पवनार -/ सेवाग्राम हमदापुर सेलडोह राष्ट्रीय महामार्ग क्र. NHI 353 आय पवनार- सेवाग्राम km. 88.00 ते km 89.00 वरील सिमेंट रोड मागील 2023 साली तयार करण्यात आला. मात्र राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर (औरंगाबाद) कंपनीचे कंत्राटदार यांच्या कडून रोड साईडच्या नाल्या केल्या नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड पवनार ग्रामस्थांन कडून करण्यात येत आहे
पवनार ते सेवाग्राम हमदापुर कांढळी सेलडोह असा 38 किलोमिटर चा कंत्राट राज राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रोडचे बांधकाम करण्याचा कंत्राट घेण्यात आला होता रोडचे काही ठिकाणी अर्धवटच बांधकाम झाल्याने ठिकठिकाणी रोड वर गड्डे पडले आहे तसेच पवनार सेवाग्राम मार्गावर सुद्धा बांधकाम अपुरेच राहिले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. पवनार टि पॉइंट बस स्टॉप जवळून km.89.00 पासुन ते km.88.00 पर्येंत सिमेंट रोडचे काम पूर्ण करण्यात आले असून रोड साईट नाल्या कत्रंदाराकडून तयार करण्यात आल्या नाही. यामुळे रोड लगत असलेल्या घरान मध्ये पावसाचे पाणी जात असुन निघायला जागाच नसल्याने ठिकाणी घरांन समोर तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच बरोबर बसस्थानक चौकाकडून ते सेवाग्राम कडे जाणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात रोडवरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरामधे शिरत असल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड ग्रामस्थ करत आहे. तर बाजीराव हिवरे यांच्या घराजवळ पावसाचे पाणी रोडवरून निघून जाण्यास मार्गच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्या कारणाने एकेरी प्रवाशी वाहतुक चालू आहे. त्यामुळे वाहन घरात कसे न्यावे वहिवाट कशी करावी असा आरोप लक्ष्मण उमाटे,अरुण सोंनटक्के , चन्द्रभान हिवरे, मोतिराम कळमकर, मुरलिधर जोगे, विश्वेशर आबटकर, मूरलिधर वैद्य, राजेश सोनटक्के ,प्रकाश भट, रोमहर्ष हिवरे, विट्ठल हुलके,सुरेश भुरे,नलिनी साटोणे,वासुदेव भूरे,मारोती उराडे,शंकर वाघमारे,रोषण उमाटे, अनुसाय उमाटे,रोशन पेटकर,संजय झाडे, पाडुरंग तिघरे,पुरुषोत्तम तिघरे,बडु तिघरे,लता वाटमोडे,नारायण पेटकर,मोहन येळणे, सूरेश पाटील,अशोक उराडे,रगदेव वाघमारे,शितल हिवरे, विजय बोरकर, मंगला उराडे,विनोद बोरकर, पुरुषोत्तम हिवरे,विनोद भट,वर्धा अर्बन बैंक,यांच्या कडून करण्यात येत आहे.
यामुळे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ करत असून राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीचे कंत्राटदार यांनी ताबडतोब रोड साईट नाल्या करून देण्यात याव्या अशी मागणी पवनार गावकऱ्यांकडून होत आहे.सदर विषय खासदर अमर काळे, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकरी राहुल कर्डिले साहेब,भुसंपादन (विपाविम) वर्धा कल्पना गोडे, कार्यकारी अभियंता नरेन्द्र बोरकर राष्ट्रिय महामार्ग, इत्यादि ना या माध्यमातुन अवगत करान्यत येत असुनं,असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा पवनार येथिल पवनार सेवाग्रम रोड पीडितांच्या वतीने देण्यात येत आहे.

सतीश अवचट साहसिक news -/24 पवणार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!