पोलीस पाटलांचा मनमानी कारभार,प्रशासन मौन.

0

🔥पोलीस पाटलांचा मनमानी कारभार,प्रशासन मौन.

🔥पोलीस पाटलांचे कर्तव्याकडे दुर्लक्ष,काही पोलीस पाटील करतात बाहेरगावी व्यवसाय.

देवळी -/ देवळी तालुक्यांमध्ये पोलीस पाटलांचा मनमानी कारभार सुरू आहे. पोलीस पाटील शासनाच्या नियमानुसार आपले कर्तव्याचे पालन करतांना दिसत नाही.काही पोलीस पाटील देवळी शहरात आपला व्यवसाय थाटून बसले आहे.आणि गावामध्ये आपले हेर नेमून त्यांच्याकडून फक्त ते गावाची माहिती घेत असतात.परंतु लोकांना कामांकरिता त्यांना वारंवार गावात येण्याची विनंती करावी लागते परंतु ते आपल्या कर्तव्याला विसरून आपले व्यवसाय तसेच अन्य कार्य बाहेरगावी राहुल पूर्ण करत असतात.यावर अनेक गावांमध्ये अनेक नागरिकांनी याविषयी शासन दरबारी तक्रार केलेली असून सुद्धा प्रशासनाने याच्यावर मौन साधले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या १७ डिसेंबर २०१२ रोजी शासन निर्णय करून प्रत्येक पोलीस पाटलास प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र कक्ष उपलब्ध देण्याबाबत सूचित करण्यात आले होते.पण अजून पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेला नाही व कक्ष उपलब्ध व्हावा, नागरिकांना वेळ आणि सुविधा मिळाव्या याकरिता पोलीस पाटील संघटनेने कोणतेही कक्ष मिळण्याकरिता प्रयत्न केल्या नसल्याचे दिसून येते.गावकऱ्यांकडे संपर्क साधला असता अनेक पोलीस पाटील गावांमध्ये राहतच नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर आजही आधुनिक युगात पोलीस पाटील हे पद स्वतःचे महत्त्व टिकून आहे.पोलीस पाटलांना शासनातर्फे सध्या १५००० रुपये प्रति महिना मानधन देण्यात येत असून त्यांच्यावर गावातील विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेले आहे. प्रत्येक पोलीस पाटलाला गाव माहिती रजिस्टर, प्रथम खबर रजिस्टर, भटक्या टोळीचे रजिस्टर, आवक जावक रजिस्टर, हिस्ट्री शीटर रजिस्टर, गुन्हा रजिस्टर, अकस्मात घटना रजिस्टर,राजकीय हालचाल रजिस्टर, चौकशी रजिस्टर, भेट रजिस्टर या सोबतच तंटामुक्तीची जबाबदारी, गावामध्ये गस्त करणे, विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे. पण यापैकी भटक्या

जमातीचे रजिस्टर व भेट रजिस्टर या व्यतिरिक्त कोणतेही रजिस्टर पोलीस पाटलाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी नाही,पण त्यास मानधन देण्यात येते. शासन आदेश १९६८ च्या कलम ८ नुसार पोलीस पाटील म्हणून केलेल्या त्याच्या कर्तव्य पालनात हानिकारक ठरणार नाही असे व्यवसाय करावे. यामध्ये जमिनीची मशागत करता येईल किंवा गावात स्थानिक धंदा व व्यापार करता येईल परंतु तो इतरत्र बाहेरगावी व्यवसाय करणार नाही अशी अट घालण्यात आलेली आहे.या अटीचे बरेच पोलीस पाटील पालन करतांना दिसून येत नाही.काही पोलीस पाटील बाहेरगावी वैद्यकीय व्यवसाय, खाजगी नोकरी व्यवसाय,तर काही मुलांच्या शिक्षणाकरिता त्यांच्यासोबत शहरांमध्ये राहतात तर काही महिला पोलीस पाटलांचे लग्न झाल्यामुळे ते सासरवाडीला गेले व गेलेल्या आहे.अशा परिस्थितीमध्ये काही गावांच्या पोलीस पाटलांची गाव जबाबदारी दुर्लक्षित झालेली दिसून येत आहे.तसेच काही गावांचे पोलीस पाटील पद रिक्त आहे.या कडे शासनाने लक्ष देऊन रिक्त असलेली पोलीस पाटील पद भरुण गाव व्यवस्थापन सुरळीत करावे.गावाबाहेर राहून आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस पाटलांवर बडतर्फीची कारवाही करून नवीन पोलीस पाटलांची नियुक्ती करावी.अशी ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.(क्रमशः)

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!