बातमी ची मोठी दखल ,,,,,पडेगावाकडे जाणाऱ्या नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्ती चे काम युध्दपातळीवर सुरु

0

🔥बातमी ची मोठी दखल ,,,,,पडेगावाकडे जाणाऱ्या नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्ती चे काम युध्दपातळीवर सुरु.

वर्धा -/ गावकऱ्यांना नाहक त्रास ठरलेल्या सालोड कडून पडेगाव कडे जाणाऱ्या पाच किलोमीटर अंतराच्या अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती चे काम अखेर हाती घेण्यात आले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवरुन वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.साप्ता.वर्धा की बात या लोकप्रिय वृत्तपत्राच्या बातमी ची दखल घेऊन रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांना तातडीने बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.चाळण झालेल्या या रस्त्यावर गिट्टी् ,चुरी टाकून डांबरीकरण केले जात आहे.रस्ता दुरुस्ती च्या कामाला सुरुवात केली असल्याने ‌गावातील नागरिकांकडून कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले,साप्ता.वर्धा की बात या वृत्तपत्राचे मुख्य संपादक विल्सन मोखाडे, उत्कृष्ट कंत्राटदार जवाहर यादव उर्फ महाराज यांचे आभार मानले जात आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!