महावितरणचे कनिष्ठ अभियंता अभिजित पजई विशेष पुरस्काराने सन्मानित…

0

वर्धा /स्थानिक ३३ के व्ही वीज वितरण उपकेंद्र मदनी येथे कार्यरत असलेले महावितरण चे कनिष्ठ अभियंता अभिजित पजई यांना विशेष पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आले. कनिष्ठ अभियंता पजइ यांनी ग्राहकांच्या वीज तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे, वीज पुरवठा अविरतपणे आणि नियमितपणे करणे वीज संचाची देखभाल व दुरुस्ती करणे, जनित्र रोहित्र यांची देखभाल करणे तसेच, वीज देयकाची नियमितपणे वसूली करून महावितरणला सहकार्य करून देणे आदी विषयावर त्याना पुरस्काराने गौरविण्यात आले. महावितरण कंपनीचे सन 2023- 24 या आर्थिक वर्षात वीज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली आणि तांत्रिक बाबी व महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले याकरिता श अभिजीत पजई, कनिष्ठ अभियंता , सेवाग्राम 2 विज वितरण केंद्र व वायगाव वीज वितरण केंद्र याचे अतिरिक्त कार्यभार सांभाळून उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.सदर गुणगौरव सोहळा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे साहेब तसेच उपकार्यकारी अभियंता राजेश खडसे साहेब व उपकार्यकारी अभियंता किरण तेलरांधे साहेब व उपकार्यकारी अभियंता बहादुरे साहेब व उपकार्यकारी अभियंता संजय पाटील साहेब व इतर मान्यवर व तंत्रज्ञ , यंत्रचालक , कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाला म्हणून परिसरातील नागरिकानी कनिष्ठ अभियंता अभिजित पजई यांचे कौतुक केले आहे.

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!