शाळेच्या कुशीत गब्बर पठाणचा हायप्रोफाईल जुगार अड्डा,पोलीस कर्मचारी अंकुशच्या ‘अर्थपूर्ण’ आशीर्वादाने यवतमाळात गुन्हेगारीचा नंगानाच!

0

हाच तो यवतमाळ येथील कृप्रशिध सट्टा किंग व जुगार भरविणारा गब्बर पठाण🔥हाच तो यवतमाळ येथील कृप्रशिध सट्टा किंग व जुगार भरविणारा गब्बर पठाण

🔥शाळेच्या कुशीत गब्बर पठाणचा हायप्रोफाईल जुगार अड्डा,पोलीस कर्मचारी अंकुशच्या ‘अर्थपूर्ण’ आशीर्वादाने यवतमाळात गुन्हेगारीचा नंगानाच!

🔥एकाच रात्रीत २२ लाख उकळले; खाकीच्या छत्राखाली हवालदार अंकुशची ‘वसुली एक्सप्रेस’ सुसाट!

​यवतमाळ -/ ज्ञानमंदिराच्या अवघ्या काही पावलांवर गुन्हेगारीचा काळा बाजार राजरोस थाटला गेला आहे आणि कायद्याचे रक्षक डोळ्यांवर आर्थिक स्वार्थाची पट्टी बांधून सुस्त पडले आहेत. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून धामणगाव मार्गावरील एका नामांकित शाळेच्या शेजारी कुख्यात गब्बर पठाणने भाड्याच्या आलिशान बंगल्यात मेट्रो शहरांनाही लाजवेल असा हायप्रोफाईल जुगार क्लब सुरू केला आहे. विद्येच्या माहेराशेजारी सुरू असलेल्या या अनैतिक अड्ड्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल आणि पत्ते पिसले जात असताना, शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अंकुशच्या वरदहस्तामुळे कायद्याची ऐशीतैशी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

​या हायप्रोफाईल क्लबमध्ये सामान्य जुगारी नव्हे, तर पांढरपेशा आणि प्रतिष्ठित वर्गातील मंडळींची वर्दळ असते. नुकत्याच घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, एका बड्या व्यापाऱ्याने तीन पत्तीच्या एकाच डावात तब्बल २२ लाख रुपये गमावले. एवढी प्रचंड रक्कम काही तासांत गमावल्यानंतर संबंधित वर्तुळात प्रचंड आगडोंब उसळला असून, या घटनेने यवतमाळच्या सट्टेबाज जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे. ​या क्लबमध्ये जुगाराच्या टेबलवर दररोज लाखो रुपयांचा ‘कट्टा’ (कमिशन) उकळला जातो. केवळ तीन पत्तीपुरताच हा बंगला मर्यादित नसून, या बंद दरवाजांआड इतरही अनेक अवैध व अनैतिक काळेधंदे जोमाने सुरू असल्याची दबक्या आवाजातील चर्चा आहे. बाहेरील व्यक्तींना संशय येऊ नये म्हणून बाहेरील सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आलिशान गाड्यांचा ताफा या ठिकाणी तैनात असतो.

​काही काळ शांत बसलेली गुन्हेगारी टोळी आता नव्या जोमाने शहरात सक्रिय झाली आहे. गब्बर पठाणसोबतच यवतमाळातील कुप्रसिद्ध ‘मामा-भांजा’ जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरली असून, या त्रिकुटाने संपूर्ण शहरात अवैध धंद्यांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. ​गुन्हेगारी वर्तुळात गब्बरच्या नावाची दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीच्या अंधारात रंगणाऱ्या या महफिलींमध्ये राजकीय लागेबांधे, आर्थिक बडे प्रस्थ आणि गुन्हेगारी जगतातील सूत्रधार एकत्र येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराशेजारी पत्त्यांचे फड रंगवणाऱ्या या टोळीवर आळा घालणार कोण, असा थेट सवाल यवतमाळकर विचारत आहेत.

​हा संपूर्ण काळा कारभार एवढ्या उघडपणे सुरू राहण्यामागे पोलीस प्रशासनाचा थेट वरदहस्त असल्याचे उघड गुपित आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अंकुश हा या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार व संरक्षक बनल्याचे बोलले जात आहे. अंकुशच्या ‘आशीर्वादा’मुळेच गब्बर पठाणला कोणत्याही पोलीस कारवाईचे भय उरलेले नाही. ​माहितीनुसार, दर महिन्याला आणि आठवड्याला ठरावीक ‘नजराणा’ पोहोचवला जात असल्याने शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला या शाळेच्या बाजूला असलेला आलिशान बंगला कधीच दिसत नाही. तक्रारी आल्या तरी त्या तात्काळ अंकुशच्या माध्यमातून दाबल्या जातात. कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेली खाकी वर्दीच जेव्हा जुगार माफियांच्या आर्थिक तुकड्यांवर लाचार होते, तेव्हा गुन्हेगारांचे मनोबल वाढणे स्वाभाविकच आहे. ​धामणगाव रोड हा शहरातील अत्यंत गजबजलेला आणि शैक्षणिक परिसर मानला जातो. हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्या मार्गावरून ये-जा करतात, त्याच मार्गावर जुगार आणि नशेचे साम्राज्य उभे राहिले आहे. एका बाजूला शाळेत मुलांना नैतिक मूल्यांचे धडे दिले जात असताना, दुसऱ्या बाजूला भिंतीपलीकडे लाखो रुपयांची जुगारी उधळपट्टी, शिवीगाळ आणि मद्यधुंद लोकांचा नंगानाच सुरू असतो.

​या प्रकारामुळे स्थानिक पालकवर्ग आणि नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. “आमच्या मुलांच्या भविष्यावर गुन्हेगारीचे सावट पडत असताना पोलीस प्रशासन केवळ हप्ते गोळा करण्यात मग्न आहे का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

​स्थानिक शहर पोलीस ठाणे अंकुशच्या प्रभावाखाली आणि आर्थिक व्यवहारात पूर्णपणे बरबटलेले असल्यामुळे, आता जनतेच्या नजरा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लागल्या आहेत. थेट शाळेच्या बाजूला चालणारा गब्बर पठाणचा हा हायटेक अड्डा उद्ध्वस्त होणार की अंकुश आणि खाकीची ही मिलीभगत तशीच चालू राहणार? गब्बर पठाण, मामा-भांजे सिंडिकेट आणि त्यांना साथ देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून यवतमाळ पोलीस आपली डागाळलेली प्रतिमा सुधारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

        ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!