शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पूजा शेंद्रे प्रकरणात केलेल्या आरोपबाबत चा पुराव्यासहित खुलासा करण्याकरिता पंकज तडस यांनी आयोजित केली पत्रकार परिषद….

0

वर्धा / येथे १३ एप्रिल रोजी पंकज तडस यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पूजा शेंद्रे प्रकरणात केलेल्या आरोपाबाबत पुराव्यासहित उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली.या ठिकाणी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्शभूमीवर घरघुती व पारिवारिक वादाला हाताशी घेऊन विद्यमान खासदार तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांची व भारतीय जनता पक्षाचे नाहक बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचे सांगितले आहे.तसेच त्यांच्या वकिलांमार्फत विद्यमान न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या वेगवेगळ्या प्रकरणाबद्दल ची यादी देखील प्रस्तुत केली.खोटे नाटे कारस्थान रचून राजकीय अस्तित्व मलीन करण्याचे अशोभनीय काम करण्यात येत असल्याचे पंकज तडस यांचे सांगणे आहे.त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संभाषन होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स सादर करून व त्या त्याबाबतचा न्यायवैधक प्रयोग शाळेमार्फत प्रमाणित केल्याचे पुरावे देखील सादर केले.पंकज तडस यांच्या संपत्तीवर कशाप्रकारे हक्क मिळवणे व त्यांची फसवणूक करायचे धडे वेगवेगळ्या तध्यामार्फत सल्ला घेत असेल्यांचे पुरावा देखील सादर केला आहे. माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे व बिनबुडाचे असून राजकीय परिवार कशाप्रकारे संपला पाहिजे व आपल्याला प्रसिद्धी कशी मिळाली पाहिजे असे द्येय पूजा शेंद्रे यांचे असल्याचे पंकज तडस यांचे सांगणे आहे.

 सागर वैद्य सहासिक न्यूज / 24 वर्धा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!