सत्य मेव जयते जनजागृती कलाकार परिषद चे वतीने संत गजानन महाराज प्रकट दिना निमित्त मोरांगना येथे वृक्ष रोपण कार्यक्रम साजरा….

0

 आर्वी / तालुक्यातील मौजा मोरांगना येथे नारायण देव मंदिर येथे दिनांक ३ मार्च२०२४ला सत्य मेव जयते जनजागृती कलाकार परिषद वर्धा जिल्हा चे वतीने कार्यक्रमाचे आयोजन श्री.महादेव पारीसे कार्यकारणी सदस्य व अशोक रेंडके यांनी केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बबनराव येवले आमगाव तर प्रमुख अतिथी सत्य मेव जयते जनजागृती कलाकार परिषद वर्धा चे सचिव पद्माकर कांबळे व प्रमुख उपस्थिती श्री.चंदू भाऊ वरघणे सचिव हे होते.सर्व प्रथम संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थितीत श्री.पद्माकर कांबळे,चंदू भाऊ वरघने,हरिभाऊ कांबळे,अशोक मैहसकर,श्रावण जी बागडे,उस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .बबनराव येवले यांनी संत गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधुन आपले विचार मांडले,तर प्रमुख अतिथी श्री.पद्माकर कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करतांना वृक्ष रोपण हे काळाची गरज आहे वृक्ष रोपण केल्याने होणारे फायदे हवा सुखाची मिळते मानसा सुखी समृध्दी येईल घरा वृक्ष रोपण करा रे दादा वृक्ष रोपण करा .हा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रम आपण सर्वांनी राबविला पाहिजे असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाला वर्धा जिल्हा तील वृध्द कलावंत,शाहीर,भीमराव निकोसे, छबीर भाई अली,लक्ष्मण कांबळे,हिरालाल चव्हान,शाहीर गोविंदराव पाटील,रामदास कोकाटे,किशोर पारीसे,रामलाल राठोड, रामाजी नगराळे, विठल नेहारे,दिवाकर वानखेडे,नागोराव नेहारे,वाल्मीक जाधव, विठल माहूरे ,तुकाराम पचारे, साहिल रेंडके,वामन नेहारे,बोरकर जी,जील्हातील भजनी मंडळ सौ.पुष्पा शेंदरे, मालुबाई नांदुरकर,मनोरमा हिंगे,मानाबई वरठी,कुसुम अंबादरे, छकुंतला येसनसुरे,छकुंतला अंबादरे,नंदा शेंदरे,कांताबाई नेहारे,शालिनी नेहारे,सुशीला शेंदरे,पंचफुला नेहारे, पुष्पा शेंदरे,शुभदा शेंदरे,इत्यादींची मोठ्या संख्येने सहभागी होते.

नरेश भार्गव साहसिक न्यूज / 24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!