सेलूच्या उपकोषागार कार्यालयातील मॉनिटरसह प्रिंटर लंपास…..

0

सेलू -/ स्थानिक उपकोषागार कार्यालयातील मॉनिटरसह प्रिंटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सेलू पोलिसांत चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम ३०५(अ) व ३३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.येथील उपकोषागार कार्यालयाला असलेला दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील दोन मॉनिटरसह दोन प्रिंटर असा २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून शुक्रवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीहून अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.

सचिन धानकुटे साहसिक news -24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!