🔥हेच ते आपल्या चेले चपट्याना समोर करून साहसिकच्या प्रतिनिधीचा तोंड दाबण्याचा प्रयत्न करणारा गणपती संस्थान खेडच्या आडून आपली राजकीय पोळी शेकण्यात व्यस्त असलेला सेवा निवृत्त कामगार उपायुक्त राजेश आडे🔥हेच ते सोशल मीडियावर सक्रिय राहून आपल्या नेत्याच्या काळया कारणाम्यावर पडदा टाकणारा अभिमन्यू जाधव
🔥हिशेब विचारताच राजेश आडेंच्या गोटात खळबळ गणपती संस्थानच्या पैशांचा हिशेब कुठे? राजेश आडेंनी द्यावे उत्तर
🔥पत्रकाराची बदनामी करून सवाल दडपणार का?
🔥‘मटका व्यवसाय चालविण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला गोपाल कोटंबकार आणि अभिमन्यू जाधव सोशल मीडियावर सक्रिय
🔥AIच्या कथित बनावट बातमीने ‘साहसिक’ प्रतिनिधीला बदनाम करण्याचा प्रयत्न
आर्णी -/ गणपती संस्थान खेडची वार्षिक आर्थिक उलाढाल किती? लाखो रुपयांच्या रुग्णवाहिका, पाणपोई, बक्षिसे आणि कार्यक्रमांसाठी पैसा नेमका येतो कुठून? देणगीदार कोण? पाच वर्षांचा ऑडिट रिपोर्ट कुठे? आणि संस्थानच्या खर्चाची ‘गंगा’ जवळा-लोणी सर्कलकडेच का वाहते ? गणपती संस्थान च्या आडून सेवा निवृत्त कामगार उपायुक्त राजेश आडे हे आपली राजकीय पोळी शेकण्यात तर व्यस्त नाही ना ?
🔥हिशेब मागितला होता गणपती संस्थानचा मग राजेश आडे अस्वस्थ का ?
असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होताच आता उत्तरांच्या कागदपत्रांऐवजी सोशल मीडियावर वेगळाच खेळ सुरू झाल्याची चर्चा आहे.
साहसिक च्या प्रतिनिधीविरोधात कथित बनावट बातमी फिरवली जात असल्याने प्रकरण अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
संस्थानला पाच वर्षांत किती देणग्या मिळाल्या, कोणी दिल्या, किती खर्च झाला, रुग्णवाहिका किती रुपयांना खरेदी केल्या, पाणपोईंसाठी किती पैसा गेला आणि जवळा-लोणी परिसरावरच एवढी मेहेरनजर कशासाठी असे प्रश्न विचारल्याने राजेश आडे यांनी आपल्या चेले चपाट्याना समोर करून कथित AI ने बातमी बनवून पत्रकाराची प्रतिमा मलिन करीत आहे
हिशेब स्वच्छ असेल तर सवाल विचारणाऱ्या पत्रकारामागे लागण्याची गरजच काय ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहे
🔥गणपती संस्थान की राजकीय जनसंपर्काची दुकानदारी ?
धार्मिक-सामाजिक संस्थेच्या नावाखाली सेवा करायची आणि सेवा करणे चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्या आडून आपली राजकीय पोळी शेकायची किंवा आपला ब्लॅक मणी व्हाईट करायचा तर हा प्रकार नाही ना ? आणि त्याच सेवांचा राजकीय जनसंपर्कासाठी फायदा करून घ्यायचा असा सवाल विचारल्यास त्यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी संस्थेच्या नेतृत्वाची आहे
राजेश आडे यांच्या पत्नीच्या संभाव्य राजकीय वाटचालीच्या चर्चा आणि जवळा-लोणी सर्कलमध्ये संस्थानच्या नावाने वाढलेले उपक्रम यामुळे ही निःस्वार्थ सेवा आहे की निवडणुकीपूर्वीची मतपेरणी ? हा प्रश्न आता अधिक ठळक झाला आहे.
🔥गोपाल कोटंबकार- अभिमन्यू जाधवांची एवढी धावपळ कशासाठी?
कुख्यात मटका किंग गोपाल कोटंबकार आणि अभिमन्यू जाधव सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे निदर्शनात येत आहे.शेलू-ब्राम्हणवाडा परिसरातील कथित मटका व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेले गोपाल कैलास कोटंबकार व अभिमन्यू मारोती जाधव खंडाळा हे आपल्या नेत्याला खुश करून आपली आर्थिक पोळीची सोय करण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच धावपळ करतांना दिसत आहे
🔥AI ची कथित बनावट बातमी; पत्रकाराला घाबरविण्याचा ‘बालिश उद्योग’?
‘साहसिक’च्या नावाचा आणि वृत्ताच्या स्वरूपाचा गैरवापर करून AI च्या मदतीने कथित बनावट बातमी तयार करण्यात आली आणि प्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्यासाठी ती प्रसारित करण्यात आली आहे.
आता संबंधित स्क्रीनशॉट, पोस्ट, लिंक व अन्य डिजिटल पुरावे सुरक्षित केले जात असून राजेश आडे यांचे चेले मटका किंग गोपाल कोटंबकार आणि अभिमन्यू जाधव यांच्याविरोधात पोलिसांत लवकरच तक्रार देण्यात येणार आहे.
🔥पत्रकाराची बदनामी केली म्हणून गणपती संस्थानचा हिशेब बदलत नाही.
सोशल मीडियावर शंभर पोस्ट टाकल्या म्हणून रुग्णवाहिकेचे बिल बदलत नाही.आणि समर्थकांची फौज मैदानात उतरली म्हणून देणग्यांचा हिशेब गायब होत नाही.राजेश आडे यांनी गणपती संस्थान खेडचे मागील पाच वर्षांचे ऑडिट रिपोर्ट, उत्पन्न-खर्चाचा तपशील आणि नियमानुसार सार्वजनिक करता येणारी आर्थिक कागदपत्रे जनतेसमोर ठेवावीत.अन्यथा एकच सवाल अधिक धारदारपणे उभा राहील साहसिक’ने फक्त हिशेबच तर विचारला; मग एवढी चिडचिड कशासाठी?(क्रमशः…)