अनंत दादा मोहोड यांच्या नेतृत्वात महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व बहुजन कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न…

0

🔥अनंत दादा मोहोड यांच्या नेतृत्वात महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व बहुजन कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न.🔥काँग्रेसने महात्मा ज्योतिबा फुलेचे हजारो बहुजन कार्यकर्त्यांच्या मनात राेहले विचार.

आर्वी,प्रतिनिधी,राजू डोंगरे,आर्वी -/ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आयोजित बहुजन कार्यकर्त्यांच्या मेळावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते मा. श्री. विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस कार्य समितीचे सदस्य मा. खा. श्री. चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री श्रीमती यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी चौक आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या हारार्पण करून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रीतसर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून १६ बलवंतेदार व समाजसेवकांचा गौरव व सत्कार करण्यात आला “जनमानसाची शिदोरी” या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते आमदार मा. विजय वडेंटीवार यांचे हस्ते केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म. रा. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ हाेते.बहुजन समाजाने महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांची सांगड घालून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा समाजासमोर आणून स्वाभिमान जागवला, ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली…’ या विचारातून शिक्षणाला परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र मानले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची क्रांती घडवली, तर ‘शेतकऱ्यांचा आसूड’ मधून शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या न्यायासाठी संघर्ष उभा केला.विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते मा. श्री. विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले की, संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या अधिकारांवर आज संकट निर्माण झाले आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारे समाजात परिवर्तन घडविण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी काही बाबा लोक अंधश्रद्धा पसरवत आहेत. राजकीय फायद्यासाठी सामाजिक विषमता पसरवली जात आहे. शेतकरी, बेरोजगारी आणि महागाई हे अत्यंत ज्वलंत प्रश्न असून जनतेच्या हितासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस कार्यसमिती सदस्य मा. खा. श्री. चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्याची गरज व्यक्त केली. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादासाठी दिलेले योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.माजी मंत्री श्रीमती. यशोमती ठाकूर यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना अनेकांनी ओबीसी समाजाच्या नावाचा वापर करून स्वतःची राजकीय उंची वाढवली आणि सत्तेची शिखरे गाठली, मात्र ओबीसी समाजाला न्याय आणि विकासापासून वंचित ठेवले, अशी टीका केली. ओबीसी समाजाचा केवळ राजकीय वापर करण्यात आला, परंतु त्यांच्या शिक्षण, रोजगार, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अपेक्षित काम झाले नाही. काँग्रेस पक्ष हा सत्तेपेक्षा समाजाच्या बाजूने उभा राहणारा पक्ष असून, “आम्ही सत्तेसोबत नाही, समाजासोबत आहोत,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर गावागावांत व्याख्यानमाला, लोकजागर अभियान, शाळा-महाविद्यालयांमध्ये विचार प्रसार, संविधान जनजागृती आणि बहुजन समाजाच्या वैचारिक एकतेसाठी व्यापक अभियान राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच शेतकरी, युवक, महिला, ओबीसी, दलित, आदिवासी आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करत राहील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.कार्यक्रमाचे आयोजक अनंत बाबूजीदादा मोहोड महासचिव तथा प्रबंध संपादक शिदोरी मासिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे शिस्तबद्ध व सुनियोजित आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. किशोर कान्हेरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष श्री. भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री. अनंत मोहोड, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सुनिल कोल्हे यांच्यासह बहूजन समाजबांधव, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन.. आशिष खंडागळे तर आभार प्रदर्शन.. चंद्रशेखर जोरे यांनी केले.या भव्य कार्यक्रमामध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्ये हजारोच्या संख्येने उपस्थित हाेती. आर्वी विधानसभा क्षेत्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा वैचारिक व संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता तुषार पेंढारकर, , श्री राऊत सर , भास्करराव पांडे, सौदानदन सिंग टाक, दिनेश लांडे, सुधाकर वाघमारे, मोहम्मद हुसेन, प्रीतम गायकी, निलेश घोरमाडे, अक्षय निस्ताने, शुभम नागपुरे, मनीष

कातोडे, शेखर केचे प्रितम गायकी, सौ शालिनी कोडापे, सौ प्रज्ञा माडगावकर व आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!