देवळीत मुंडे इफेक्ट फेल..अन्न व औषधी प्रशासन विभागाची मोठे किराणा दुकान व मेडिकल स्टोअर्स वर कारवाई करण्यात उदासीनता.

0

🔥देवळीत मुंडे इफेक्ट फेल..अन्न व औषधी प्रशासन विभागाची मोठे किराणा दुकान व मेडिकल स्टोअर्स वर कारवाई करण्यात उदासीनता.🔥मुंडे इफेक्ट मुळे लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ. 

देवळी -/ सध्या महाराष्ट्र राज्यात तुकाराम मुंडे महाराष्ट्र राज्य अन्न व औषधी प्रशासन आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबरोबर अनेक शहर व गावांमध्ये धडक कारवायांचा भडीमार झाला त्यामुळे भेसळ करणारे तसेच त्या संबंधित नियमांना पायाखाली तुडविणारे कंपन्या मोठे दुकानदार यांना चांगलीच चपराक बसली आहे. आणि जनतेत अन्न व औषधी प्रशासन विभागाविषयी विश्वासाची भावना जागृत झाली. आता काहीतरी प्रत्येकाला आपल्या गावा शहरात अन्न व औषधी प्रशासन यांच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करणार असे वाटत होते परंतु तसे काहीच झाले नाही. त्यामुळे देवळी शहराच्या जनतेमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे कारण मोठे किराणा दुकानदार व मेडिकल स्टोअर्स भाडोत्री व पतनीच्या परवाण्यावर दुकान चालवीणाऱ्यांवार अन्न व औषधी प्रशासन चाल ढकल पणा करीत आहे व देवळी शहरातील लहान दुकानदार व टपरी चालक यांच्यावर कारवाहीची चपराक बसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने देवळीत मुंडे इफेक्ट फेल झाल्याची चर्चा सर्रास देवळी शहरात सुरू आहे.

     देवळी शहरात मोठमोठे किराणा दुकानदार खुल्या मध्ये खाद्यतेल विक्री करत आहे त्यामध्ये अनेक वर्षापासून जगलेल्या लोखंडी टाक्या तसेच काही दुकानदारांकडे छतावर ठेवल्या जाणाऱ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या त्यामध्ये खुल्या तेलाची साठवणूक करून विकल्या जात आहे तेल विक्रीच्या खुल्या पीप्यांमध्ये उंदीर राजा स्नान करून पीप्यातून निघून जातात असे दुकानात काम करणाऱ्या लोकांनी माहिती दिली आहे तसेच देवळी शहरामध्ये मेडिकल स्टोअर्स चे परवाने अनेक महिलांच्या नावावर असून ते दुकान त्यांचे दहावी नापास हितसंबंधी चालवत आहे तसेच काही मेडिकल स्टोअर्स धारकांनी औषध विक्रीचे परवाने भाडेतत्त्वावर घेऊन दुकाने चालवीत असल्याचे निदर्शनात येते हे सर्व नियमबाह्य काम सध्या देवळीच्या औषधी विक्री च्या क्षेत्रात सुरू असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. देवळीकर जनतेने वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या भावना अन्न व औषधी प्रशासन विभागाला कळविल्या होत्या परंतु अन्न व औषधी प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यास उदासीनता दाखविली कारण काही औषध विक्रेत्यांचे म्हणणे होते की आमचे थेट संबंध वरपर्यंत आहे आमच्यावर कार्यवाही होऊ शकत नाही असे खुले आवाहन प्रशासनाला केले आहे.

  परंतु दूध, दही विक्रेते, पान टपरी, सुपारी ट्रेडर्स, चहा विक्रेते व पॅकेट बंद पदार्थ विकणारे लहान दुकानदार यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने धडक कारवाई करीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणून ठेवली आहे. मोठ्यांना अभय तर लहानांना उपासमारी या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या दुहेरी मापदंडामुळे देवळी शहरात मुंडे इफेक्ट पूर्णतः फेल ठरलेला आहे अशी चर्चा देवळी शहरात सुरू आहे.

          सागर झोरे साहसिक       News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!