सहकार भारती दिन उत्साहात साजरा…

0

🔥सहकार भारती दिन उत्साहात साजरा.

सिंदी -/ (रेल्वे) या ठिकाणी सहकार भारती शाखा सेलू व समर्थ नागरी सहकारी पत संस्था सिंदी (रेल्वे) यांच्या संयुक्त विद्यामानाने सहकार भारती दिन साजरा करण्यात आला या वेळी नगरपरिषद सिंदी रेल्वे च्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पदी निवडून आलेल्या सौ. राणी स्नेहल कलोडे, उपाध्यक्ष अखिल हमीद शेख, सदस्य सौ. अजया अनिल साखळे, गटनेता श्री. प्रवीण विश्वनाथ मडावी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यकामाच्या अध्यक्षीय भाषणात सहकार भारतीच्या कार्यावर प्रकाश टाकतांना सुधाकरजी घवघवे म्हणाले कि, सहकार भारती ही संस्था सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून समाजात शुद्ध रूपात आपली सेवा देण्या करिता तयार करते. या वेळी सहकार भारती शाखा सेलूचे अध्यक्ष राजेंद्र गवईकर, उपाध्यक्ष सौ. मनीषा झिलपे,श्रावण झाडे,अरुण ढेंगरे, ओमप्रकाश राठी,दिनेश जोशी,अशोक पराते,हेमंत सोनटक्के,विनोद भुते,मनोज पेटकर व इतर सदस्य उपस्तित होते कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन सुरजकुमार भगत यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सिंदी-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!