देशसेवेचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा जागर.! सैन्य दलातील जवानाच्या हस्ते ध्वजारोहन….

0

🔥देशसेवेचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा जागर.! सैन्य दलातील जवानाच्या हस्ते ध्वजारोहन.

🔥घोराडच्या माहेर शांती निवासात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 सेलू -/ देशसेवेचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा जागर… अशा वातावरणात घोराड येथील माहेर शांती निवास येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान सुरज गुणवंतराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
सेलू तालुक्यातील रेहकी(कला) येथील रहिवासी असलेले सुरज शिंदे हे सन २०१८ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले असून सध्या ते पंजाब येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. सुट्टीसाठी ते सध्या आपल्या गावी आले असल्याची माहिती मिळताच माहेर शांती निवासचे संचालक अतुल शेळके यांनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्याची संकल्पना मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत प्रजासत्ताक दिनी सुरज शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी जवानाच्या शौर्याला सलाम करत देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी माहेर शांती निवासमधील सदस्य, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांचा सन्मान करून प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात देशभक्तीची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला.

        सचिन धानकुटे                       साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!