शेगावात 19 वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार….

0

🔥शेगावात 19 वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार.
🔺संतनगरी शेगाव हादरली, घटनेने नागरिकांमध्ये संताप
🔺पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी आकाश भामरे अटकेत.

🔺गजानन महाराज मंदिर परिसरातून आरोपीस अटक.

🔺अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.

शेगाव (बुलढाणा) -/ संतनगरी शेगाव शहरात एका 19 वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन शहरातील एका लॉजवर नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला, तसेच घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित तरुणीने शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गजानन महाराज मंदिर परिसरातून आरोपी आकाश सोनाजी भामरे याला अटक केली आहे. आरोपीविरोधात विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शेगावसह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 शेगाव,बुलढाणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!