पवणार येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळांचा रंगतदार कार्यक्रम….

0

🔥पवणार येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळांचा रंगतदार कार्यक्रम.

‎पवणार -/ महात्मा गांधी आयुर्वीज्ञान संस्थान सेवाग्राम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ELITE प्रकल्पामार्फत पवणार येथील सचिवालयात स्पोर्ट अँड गेम्स उपक्रम उत्साहात पार पडला. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आले.
‎कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा फॅशन शो विशेष आकर्षण ठरला. तसेच लिंबू-चमचा शर्यत, आईच्या पत्र, खाद्यपदार्थांशी संबंधित मजेदार खेळ आणि फुग्यांचे विविध खेळ घेण्यात आले. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
‎या प्रसंगी सहजीवन गटातील मास्टर ट्रेनर प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस फळांचा केक कापून साजरा करण्यात आला. मेळघाट येथील सि-तारा टीमचे सदस्यही उपस्थित होते. सर्व गटांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
‎कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चनाताई घूगरे, अर्चनाताई वंजारी (आशा वर्कर) तसेच सहजीवन समिती पवणार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

         सतीश अवचट                    साहसिक News-/24 पवणार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!