🔥श्रीक्षेत्र साहूरचा आदर्श धुलीवंदन सोहळा,विविध स्पर्धेत रंगणार शेकडो विद्यार्थी,काव्यसंग्रह व ग्रंथ प्रकाशन सोहळा.
साहुर -/आष्टी तालुक्यातील साहुर या गावात गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श धुलिवंदन सोहळा होत असून याची परंपरा कायम आहे
टीव्ही चित्रपटात बघून आज खरी संस्कृती बाजूला ठेवून गोपी कृष्णाच्या नावे सर्वत्र होळी शिमगा धुलीवंदन चा धिंगाणा सुरू आहे .भावी पिढीचा विचार न करता व्यसनाधीन तरुण आई-बापांना खांदा द्यावा तर बापाच्याच खांद्यावर स्मशानात जात आहे. हे बघून श्रीक्षेत्र साहूर येथे गेल्या पंधरा वर्षापासून गुरुकुंज आश्रम चे आजीवन प्रचारक रमेशचंद्र सरोदे यांनी आदर्श धुलीवंदन सोहळा सुरू केला आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या २३ व्या अध्यायात आदर्श होळी आणि शिमगा कसा करावा सांगितले आहे परंतु व्यसनाधीन लोकांनी या सण उत्सवाला विचित्र स्वरूप दिले आहे.
श्रीक्षेत्र साहूर येथे यानिमित्ताने आजवर विविध स्पर्धा परीक्षेत पास झालेले किंवा संरक्षण दलात गेलेल्या अनेक गुणवंतांचा व
ज्येष्ठ समाजसेवकांचा या सोहळ्यात जाहीर सत्कार करण्यात आला आहे .यावर्षी दि.३मार्च ला स.९ते दु.२ पर्यंत कॉन्व्हेंट पासून वर्ग ९ च्या बालकांवर सु-संस्कार करण्याच्या दृष्टीने वेशभूषा स्पर्धा ,गीत गायन स्पर्धा ,भाषण स्पर्धा व कराओके गायन तसेच उमादीदी पैठणकर यांच्या तुफान विनोदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. •. याप्रसंगी कृष्णाभाऊ हरले यांच्या “निनाद” काव्यसंग्रहाचे प्रकाशन व रमेशचंद्र सरोदे यांच्या “लढा विद्यापीठ नामकरणाचा” या ग्रंथाचे विमोचन वर्धा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांचे हस्ते होणार असून अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रमचे राष्ट्रीय वक्ते ॲड. दिलीप कोहळे, अमोल सोटे, नायब तहसीलदार नागपूर किशोर शेंडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार रेखा शेंडे , ॲड.अश्विनी कोहळे, ॲड .अश्विनी गायकवाड. दीपक खरडे, गजानन सरोदे, वसंत ढवळे गुरुजी, ईश्वरभाऊ वरकड मा.सभापती पं.स.आष्टी, ज्येष्ठ भाजपा नेते उत्तमराव करांगळे ,जेष्ठ कार्यकर्ता प्रशांत काकपुरे , प्रभाकर बोंदरे,सरपंच साहूर प्रकाश गायकवाड, सरपंच सावंगा विनोद सोनोने , उपसरपंच रिता ढवळे, चंद्रकला ठाकरे, माजी सरपंच मनोहर बिजवे , वनिता लवणकर,भावना खरडे, देवानंद पेठे, प्रभाकर बोंद्रे, गोपाल गावंडे ,लीलाधर अग्रवाल, पांडुरंग जाधव, रामकृष्ण घारे ,मनोहर दंडाळे, गुणवंत राऊत, मोहनदास राठी, अनिल सिलस्कार ,सुभाष रिठे, लक्ष्मण सनेसर ,रवि वडस्कर, तेजराव गावंडे, सुरेश ठाकरे, श्रीकृष्ण खिरटकर, प्रभाकर भोरे, पांडुरंग हिवरे,सुभाष चुर्हे, वासुदेव चांदुरकर,प्रिया प्रमोद बिजवे, मंगेश टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शरद वरकड ,सुधीर वाघ ,प्रा.विनोद पेठे हे राहणार आहे. •. याप्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके,सेवाभावी कार्यकर्त्यांना संजीवनीताई माने (राज्य प्रभारी पतंजली योग समिती वर्धा) तर्फे टी-शर्ट, गजानन सरोदे कडून यशस्वी स्पर्धकांना एक झाड व सर्व बालकांना आकर्षक भेट वस्तू तसेच सर्व स्पर्धकांना स्व. सुरेंद्रजी सोटे स्मृति प्रित्यर्थ आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे मुख्य संघटक विनय तळहांडे यांनी कळविले आहे.