काव्यसंग्रह व विद्यापीठ नामकरणाचा इतिहास रचणारे गाव माझी जन्मभूमी असल्याचा मला गर्व आहे…

0

🔥काव्यसंग्रह व विद्यापीठ नामकरणाचा इतिहास रचणारे गाव माझी जन्मभूमी असल्याचा मला गर्व आहे.

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथे गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श धुलिवंदन सोहळा संपन्न होत असून त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात यावेळी मंगेश वरकड जिल्हा माहिती अधिकारी वर्धा यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले
की प्रत्येकालाच आपली जन्मभूमी ही प्रिय असते पण माझ्या गावाची महती ही वेगळीच आहे.
” जिसने देखा दिल्ली लाहोर / उशीने देखना धाडी सावर /
हे ब्रीद सार्थकी ठरविणारे ,स्वातंत्र्य संग्रामात दिल्लीपर्यंत धडक मारणारे येथील स्वातंत्र्यवीर ,गरीबीत राहूनही काव्याचा वर्षाव करणारे कवी, नागपूर व अमरावती विद्यापीठ नामकरणाचा लढा लढणारे क्रांतिकारक या भूमीत जन्मले म्हणूनच माझी श्रीक्षेत्र साहूर ही जन्मभूमी मला प्रिय आहे. असे गौरवोद्गार वर्धा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी आदर्श धुलिवंदन सोहळ्यात काढले.
या भूमीत शिक्षण घेत असताना मला या गावातूनच गुरुदेवाच्या तत्त्वज्ञानाचे सुसंस्कार मिळाले. म्हणूनच मलाही या क्रांती भूमीचा गर्व आहे. असे मनोगत अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम चे राष्ट्रीय वक्ते ॲड. दिलीप कोहळे यांनी व्यक्त केले .
श्रीक्षेत्र साहूर येथे दि ३ मार्च ला आदर्श धुलिवंदन सोहळ्यात हे मान्यवर बोलत होते. गेल्या पंधरा वर्षापासून येथे व्यसनमुक्त होळी व रंगविणा धुलीवंदन सोहळा विविध उपक्रमाने साजरा होतो .यावर्षीही भावी पिढी वाचवण्यासाठी व त्यांच्यावर सु-संस्कार करण्यासाठी वेशभूषा ,गीत गायन ,भाषण स्पर्धा ,कराओके गीत गायन आदी स्पर्धांमध्ये कॉन्व्हेंट पासून वर्ग ९च्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त व विषारी रंगापासून अलिप्त राहून उत्स्फूर्त भाग घेतला. वरील स्पर्धांचे परीक्षण शरद वरकड ,नामदेवराव बाळोकर,सुधीर वाघ यांनी केले. याप्रसंगी येथील कवी कृष्णा हरले साहूरकर यांच्या “निनाद” या काव्यसंग्रहाचे तसेच रमेशचंद्र सरोदे यांच्या “लढा विद्यापीठ नामकरणाचा” या ग्रंथाचे प्रकाशन जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड़, अँड. दिलीप कोहळे, जिल्हा सेवाधिकारी प्रभाकर गायकवाड ,माजी पं. स. सभापती ईश्वर वरकड ,जेष्ठ भाजपा नेते उत्तमराव करांगळे, प्रशांत काकपुरे ,साहूरचे सरपंच प्रकाश गायकवाड ,सावंगा (पु) सरपंच विनोद सोनोने, बेलगावचे सरपंच स्वप्निल खवशी, मोहनदास राठी ,सुरेश अहिव ,गजानन सरोदे, ॲड. अश्विनी कोहळे ,दीपक खरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या सोहळ्यात राळेगाव (यवतमाळ) च्या उमादेवी पैठणकर यांच्या भारुड कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला. यासाठी अमोल सोटे पत्रकार, प्रभाकर बोंदरे,प्रशांत काकपुरे, प्रमोद बिजवे, विनोद सोनोने, मंगेश टाकळकर, मनोहर बिजवे, उत्तम करांगळे,राहुल खरबडे ,प्रशांत गुल्हाने ,गजानन सरोदे ,संजीवनीताई माने (राज्य प्रभारी पतंजली), रेखा किशोर शेंडे वर्धा ,आकाश पाटमासे, जीवन बहुरूपी, शिवानी वाघ ,ज्योती गुल्हाने,योगेश चांदुरकर ,विनय तळहांडे यांचा सेवा सहयोग मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.गायत्री घोटकर ,आभार कु. कल्याणी खिरटकर यांनी केले .राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

           शरद वरकड साहसिक     News-/24 साहूर आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!