​”‘आरोग्यदूत’ आमदार सुमित वानखेडे : सामान्यांच्या डोळ्यांतील ‘नवा प्रकाश’!”

0

🔥​”‘आरोग्यदूत’ आमदार सुमित वानखेडे : सामान्यांच्या डोळ्यांतील ‘नवा प्रकाश’!”

🔥आमदार सुमित वानखेडे यांच्या पुढाकारातून आर्वी विधानसभा क्षेत्रात होत आहे ‘दृष्टी’ क्रांती

🔥​”१९ हजार पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी, जवळपास १७ हजार चष्म्यांचे वाटप..!”

आर्वी -/आरोग्यसंपन्न समाज’ हेच ध्येय उराशी बाळगून आर्वी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुमित वानखेडे यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या “नेत्र तपासणी व चष्मा वाटप” मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा आणि ‘द नज इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत ९ मार्च २०२६ पर्यंत तब्बल १९,३४५ नागरिकांची नेत्र तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

केवळ तपासणी करून न थांबता, ज्या नागरिकांना जवळील दृष्टीचा दोष आहे, अशा १६,९९१ गरजूंना तातडीने दर्जेदार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. मतदारसंघातील आकडेवारीनुसार, कारंजा तालुक्यात १०,६१७ नागरिकांची तपासणी करून १०,०६९ चष्मे वाटप करण्यात आले आहेत. तसेच, आष्टी तालुक्यात ६,९२४ तपासण्यांतून ५,३८२ नागरिकांना दृष्टीचा आधार मिळाला आहे, तर आर्वी तालुक्यात आतापर्यंत १,८०४ तपासण्या पूर्ण झाल्या असून १,५४० नागरिकांना चष्मे देण्यात आले आहेत.

आपल्या मतदारसंघातील एकही गरजू नागरिक दृष्टीदोषामुळे मागे राहू नये, ही आमदार सुमित वानखेडे यांची तळमळ या उपक्रमातून दिसून येत आहे. “मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुरक्षित राहणे ही माझी प्राथमिकता आहे. जोपर्यंत शेवटच्या गरजू व्यक्तीला या सुविधेचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत असे उपक्रम निरंतर सुरू राहील,” असा विश्वास आमदार वानखेडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील वृद्ध आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, जनतेने “आमदार असावा तर असा” अशा भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

        ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!