वणीत लायसन्स एका नावाचे, मेडिकल चालवतो दुसराच….

0

🔥हेच ते वणीत लायसन्स एका नावाचे,मेडिकल चालवतो दुसराच….

🔥•गांधी चौक ते अन्य मुख्य चौकातील भोंगळ उघड येणे गरजेचे.

🔥•संबंधित विभागाची हात मिळवणी की साटेलोटे?

वणी -/ शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या मेडिकल व्यवसायात गंभीर अनियमितता उघड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शहरातील गांधी चौक ते मुख्य चौकात अनेक मेडिकल दुकानांमध्ये परवाना एका व्यक्तीच्या नावावर असताना प्रत्यक्षात दुकान चालवणारा हा दुकानात उपस्थित राहत नाही आणि औषधे देणारा मात्र दुसराच असल्याची बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे दुकानात बसणाऱ्या व्यक्तींना औषधांचे कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसतानाही ते नागरिकांना सर्रास औषधे देत असल्याची माहिती समोर येत आहे.

वणी शहर परिसरात तर ही परिस्थिती अधिकच चिंताजनक असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही ठिकाणी मेडिकलचा परवाना असलेली व्यक्ती दुकानात हजर नसते, तर त्याऐवजी नातेवाईक किंवा इतर कर्मचारी दुकान सांभाळताना दिसतात. औषधांचे योग्य ज्ञान नसतानाही औषध देणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

आरोग्य विभागाच्या नियमांनुसार मेडिकल दुकानात परवानाधारक फार्मासिस्टची उपस्थिती आवश्यक असते. मात्र वणी शहरात अनेक ठिकाणी या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. काही मेडिकलमध्ये औषधे देणाऱ्या व्यक्तींना औषधांची योग्य माहिती नसतानाही ते रुग्णांना औषधे देताना दिसत आहेत. यामुळे चुकीची औषधे मिळण्याचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर प्रकारे खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे इतक्या गंभीर प्रकाराकडे संबंधित आरोग्य व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. वणीमध्ये तपासणीसाठी अधिकारी का येत नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकारामागे काही साटेलोटे तर नाहीत ना? अशीही चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून नियमभंग करणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता वणीकरांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.(क्रमशः)

      ब्युरो रिपोर्ट साहसिक              News-/24 वणी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!