ईटीएस मोजणीकडे दुर्लक्ष करणा-या खणीकर्म अधिका-याला निलंबित करा

0

🔥ईटीएस मोजणीकडे दुर्लक्ष करणा-या खणीकर्म अधिका-याला निलंबित करा.

🔥रेल्वे गौण खनीज घोटाळा प्रकरणी अमोल कोमावार यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी.

 यवतमाळ -/ वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रकल्पातील गौण खनीज गैरप्रकार प्रकरणी ईटीएस मोजणी करुन दोन महिण्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले होते. या प्रकरणात यवतमाळ तालुक्यात ईटीएस मोजणीला जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन विलंब केला जात आहे. खनीज संदर्भात सर्वप्रथम कर्तव्याची जबाबदारी जिल्हा खणीकर्म अधिका-याची असतांना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांना कर्तव्यात कसूर तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याप्रकरणी निलंबित करण्याची मागणी तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांचा गौण खनीज घोटाळा चांगलाच गाजत आहे. सदर प्रकरणातील जबाबदार अधिका-यांची बैठक विधानसभा उपाध्यक्षांनी नागपूर अधिवेशन दरम्यान बोलविली होती. ईटीएस मोजणीचे आदेश दिले असतांना टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे अधिका-यांना जाब विचारण्यात आला. एवढेच नव्हे तर दोन महिण्यात ईटीएस मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अहवाल सादर न केल्यास जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुध्दा अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या गौण खनीज घोटाळा प्रकरणी यवतमाळ जिल्हयात ईटीएस मोजणी सुरु करण्यात आली. मात्र यवतमाळ तालुक्यात या मोजणीला जाणीवपुर्वक विलंब केला जात आहे. चार महिण्यापासून ईटीएस मोजणीचे भिजत घोंगडे सुरु आहे. अवैध गौणखनिज उत्खननाबाबत शासनाने कठोर भूमिका घेतली असून पुणे जिल्ह्यात एका उपजिल्हाधिकाऱ्यासह चार तहसीलदार तसेच इतर सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापेक्षाही मोठा भ्रष्टाचार वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या गौण खनिज उत्खननात झाला असून संबंधित अधिका-यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे

(🔥एक किलोमिटर मोजणी)

यवतमाळ कळंब सिमेवरील चापर्डा ते यवतमाळ तालुक्यातील तिवसा बोरजई पर्यन्त 33 किलोमिटर मध्ये प्रचंड उत्खनन झालेले असल्यामुळे संपुर्ण ईटीएस मोजणी करायची आहे. मात्र खणीकर्म अधिका-यांनी जाणीवपुर्वक मनुष्यबळ उपलबध करुन दिलेला नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी जाऊन तांत्रिक माहिती नसतांना फक्त एक किलोमिटर अंतरामधील मोजणी करुन अहवाल सादर केला आहे. या एक किलोमिटर मध्ये चार पुल येत असल्यामुळे वास्तविक फक्त दोनशे मिटर अंतरामध्ये मोजणी करण्यात आली. ही मोजणी फक्त ट्रॅक वरील उत्खननाची होत आहे. परिसरात झालेले उत्खनन वेगळेच आहे. या दोनशे मिटर मध्ये 45 हजार 984 ब्रास उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. सातशे रुपये ब्रास प्रमाणे याची किंमत साडे तीन कोटी होत आहे. विशेष म्हणजे उत्खननाची खोली मोजण्यासाठी मॉडर्न साहित्याची गरज असून उपलब्ध नसल्यास भाडेतत्वावर मागवुन घेण्याची सुचना देण्यात आली आहे. हे साहित्य उपलब्ध झाले तरी ते वापरण्याचे ज्ञान नसल्यामुळे खासगी सल्लागारामार्फत करण्याचे सुचित करण्यात आले आहे. वास्तविक खणीकर्म विभागात तांत्रिक मनुष्यबळ इतर कार्यालयांमध्ये उपलब्ध असतांना त्यांचा वापर जाणीवपुर्वक टाळण्यात आला. एकंदरीत गेल्या चार महिण्यापासून जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत जिल्हा खणीकर्म अधिका-याला निलंबित करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक           News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!