दत्ता मेघे समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणास्त्रोत होतेः सुनील राऊत

0

🔥दत्ता मेघे समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणास्त्रोत होतेः सुनील राऊत.

🔥ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅबतर्फे श्रध्दांजलि सभेचे आयोजन.

वर्धा -/ विदर्भातील ज्येष्ठ नेते शिक्षमहर्षी समाजसेवक दत्ता मेघे यांच्या अकस्मात निधानाने वर्धावासीयांसह संपुर्ण विदर्भात शोककळा पसरली. त्यांनी शैक्षणिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अफाट योगदान दिले. दत्ता मेघे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणास्त्रोत होते. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅबचे सदस्य सुनील राऊत यांनी व्यक्त केले.

ते २४ मार्च रोजी ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅब व्दारा आयोजित श्रध्दांजलि सभेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

दत्ता मेघे त्यांचा साधेपणा, दूरदृष्टी आणि लोकसेवेचा जिव्हाळा यामुळे ते वर्धा व विदर्भातील जनतेच्या मनात एक आत्मीय माणूस म्हणून राहिले त्यांच्या निधनाने वर्धावासीयांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या एक आधारवड निधून गेल्याची भावना, अॅड विजय सिंह, ठाकुर, किशोर मिटकरी प्रा. शिवाजी इथापे, मनोहर पंचारिया, इमरान राही, विलास कुळकर्णी, नाना पहाडे, यांनी व्यक्त केले.

ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅब सदस्यांनी स्व. दत्ता मेघे यांच्या छायाचित्रासमोर पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक, आरोग्य, आणि सामाजिक कार्याचा गौरव केला सभेत उपस्थितांनी त्यांच्या दातृत्व गुण आणि लोकसेवेच्या भावनेला स्मरून एक मिनिट मौन पाळले. या श्रध्दांजलि कार्यक्रमांचे संचालन ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅबचे सचिव मोहन मोहिते यांनी केले. सभेला ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅबचे सदस्य प्रकाश रायटर, रमेश कोंबे, यज्ञेश्वर मेंढे, अॅड. सुरेश श्रीरंगवार, हरीष तांदळे, राजु लभाणे, गंगाधर नागपुरकर, किशोर ठाकुर, स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या श्रध्दांजलि कार्यक्रमाने वर्ध्यातील जनमानसात मेघे यांच्या स्मृतींना उजळणी मिळाली.

     ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!