रामनवमीच्या शोभायात्रेत धार्मिक सौहार्दाचा संदेश,इरफान मलनस यांच्या अन्नदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक…

0

🔥रामनवमीच्या शोभायात्रेत धार्मिक सौहार्दाचा संदेश,इरफान मलनस यांच्या अन्नदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

यवतमाळ -/रामनवमी निमित्त यवतमाळ शहरात भव्य शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून फिरणाऱ्या या शोभायात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. या दरम्यान दत्त चौकात इरफान मलनस व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अन्नदान व जलसेवेचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे नागरिकांनी खूप कौतुक केले.

शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी त्यांनी प्रेमाने अन्नदान केले तसेच पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली. हिंदूंच्या सणाच्या दिवशी एका मुस्लिम युवकाने पुढाकार घेत राबविलेल्या या उपक्रमामुळे धार्मिक सौहार्दाचा सुंदर संदेश समाजात पोहोचला.

या उपक्रमाला यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे सर, अजय मुंदडा, लक्ष्मीकांत लोळगे, डॉ दीपक शिरभाते, डॉ. राशतवार, जुगल तिवारी, डॉ. महेश चव्हाण, निशांत गौतम, बंटी गुप्ता, अरविंद इंगळे, प्रथमेष बट्टलवार, साजिद शेख, आकाश धूरट, रोहित राठोड, बंटी श्रीवास, असलम पठाण, सलमान मालानी, राजेश गढीकर यांच्यासह अनेक मान्यवर व भाजपाच्या नेत्यांनी भेट देत इरफान मलनस यांचे कौतुक केले. “शहरात धार्मिक सद्भावना टिकून राहावी, आपसातील प्रेम वृद्धिंगत व्हावे” असा सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला. अनेक भाविकांनी या मंडपातून अन्नदानाचा लाभ घेतला, तर तहानलेल्या बांधवांना जलसेवा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, कोरोना काळातही इरफान मलनस यांनी अन्नदान, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श ठेवला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे त्यांचा हा उपक्रमही सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!