🔥श्री क्षेत्र बगारीवाले हनुमान मंदिरात भजन संध्या काला व महाप्रसादाचे आयोजन.
देवळी,विजयगोपाल -/ येथिल पुलगाव रस्त्यावर पेट्रोल पंप समोर असलेल्या प्राचीन श्री क्षेत्र बगारिवाले हनुमान मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री हनुमानजी जन्मोत्सव चे औचित्य साधून दि 01/04/2026 रोजी वार बुधवार ला रात्री श्री कृष्ण अवधूत महाराज भजनी मंडळाचे अवधूती भजन जागृती आणि दि 02/04/2026 रोजी वार गुरवार ला पहाटे श्री हनुमानजी जन्मोत्सव आणि सकाळी 10 वा वारकरी भजन मंडळाचे काल्याचे भजन आणि दुपारी 01वा पासून ते सायंकाळी 07वा पर्यंत महाप्रसाद चे आयोजन समस्त श्री हनुमानजी भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे
तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
या मंदिरात स्वच्छ मनाने दर्शन केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा हजारो भक्ताचा विश्वास आहे.