दारोडा येथील HP पेट्रोल पंपावर रात्री छापा; टँकरमध्ये अवैधरित्या डिझेल भरताना कारवाई..

0

🔥दारोडा येथील HP पेट्रोल पंपावर रात्री छापा; टँकरमध्ये अवैधरित्या डिझेल भरताना कारवाई.

हिंगणघाट -/ तालुक्यातील मौजा दारोडा येथे असलेल्या ARS Energy HP Fuel Station वर पोलीस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत मोठ्या टँकरमध्ये संशयास्पदरीत्या डिझेल भरत असल्याचा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई 23 मे 2026 रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वडनेर यांना भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार दारोडा येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावरून नोझलद्वारे मोठ्या टँकरमध्ये डिझेल भरले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस विभाग व पुरवठा विभागाने संयुक्तपणे घटनास्थळी धाव घेतली.

कारवाईदरम्यान वाहन क्रमांक MH 34 BZ 9030 हा टँकर पोलिसांनी डिटेन करून ठेवला होता. तक्रारकर्ता गगन पोहाणे, रा. दारोडा यांनी रात्री सुमारे 12.30 वाजता संबंधित टँकरमध्ये पेट्रोल पंपाच्या नोझलद्वारे डिझेल भरले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.

पंचनाम्यात टँकरच्या कंपार्टमेंट क्रमांक 2 मध्ये बिल पावतीनुसार 169.89 लिटर HSD डिझेल आढळून आले. तसेच संबंधित प्रमाणात डिझेल विक्री झाल्याचेही स्पष्ट झाले. याप्रकरणी पंचनामा, बयाण व जप्तीपत्रक तयार करून टँकर जप्त करण्यात आला. जप्त वाहन हेड कॉन्स्टेबल मनोज सूर्यवंशी, बक्कल क्रमांक 1274 यांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणात ARS Energy HP Fuel Station दारोडा यांनी “मोटार स्पिरीट अॅन्ड हाय स्पीड डिझेल रेग्युलेशन ऑफ सप्लाय, डिस्ट्रीब्युशन अॅन्ड प्रिव्हेन्शन ऑफ मलप्रॅक्टिस ऑर्डर 2005” तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.

      ईकबाल पहेलवान साहसिक      News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!