“मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही”

0

🔥“मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही”

  वर्धा -/ पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 30 मे 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील माऊली पार्क संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी 1) निखील मनोजराव रामनवार, वय 25 वर्ष, रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट, 2) पियुष राजु मुसळे, वय 27 वर्ष, रा. गोमाजी वार्ड हिंगणघाट 3) जय वसंतराव चुटे, वय 21 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट ह.मु. एकात्मता नगर जयताळा नागपुर 4) कार्तिक वसंतराव हमंद वय 29 वर्ष, रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हे मोक्कावर हजर मिळुन आले असुन, त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेजवळ मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, अंमली पदार्थ विक्री करून मिळविलेली नगदी रक्कम, मोबाईल तसेच एक टि.व्ही.एस. ज्युपीटर मोपेड वाहन क्र. एम.एच. 32 बि.ए. 1494 मोपेड मिळुन आली. आ.क्र 2 पियुष मुसळे हा वर्धा जिल्ह्यातुन हद्दपार असतांना सुध्दा त्याने हद्दपारी आदेशाचे उल्लघन करून मनाईक क्षेत्रात मिळुन आला. मिळुन आलेला मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ चा साठा हा चारही आरोपीताचे मालकिचा असुन, तो त्यांनी आ.क्र. 5 पंकज साठोणे रा. नागपुर याचेकडुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 54 ग्रॅम 05 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थ, नगदी 32,000 रू, 06 मोबाईल व 01 मोपेडसह जु.कि. 4,71,920 रू चा मुद्देमाल जप्त करून, सर्व 05 आरोपींविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, हमीद शेख,रोशन निंबोळकर,महादेव सानप,रवि पुरोहित, सागर भोसले, विकास मुंडे, विनोद कापसे, सुगम चौधरी, शुभम राऊत, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

            गणेश रेंगे साहसिक          News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!