🔥आदर्श सुसंस्कार पिढी निर्माण करा- सुधीर पागुंळ.🔥 आचार्य अत्रे महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न.
वर्धा -/ ज्या प्रमाणे आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर, आचार्य रामकृष्ण अञे महाराज यानी ग्रामगीते च्या माध्यमातून वं राष्ट्रसंता ना अभिप्रेत असी पिढी घडविली ती पिढी निर्माण करण्यासाठी सुसंस्कार संस्कार शिबीर होणे काळाची गरज आहेत असे प्रतिपादन वर्धा शहराचे नगराध्यक्ष श्री. सुधीरभाऊ पागुंळ यानी व्यक्त केले.श्री गुरुदेव सेवा मंडळ नांदोरा- सेवाग्राम मानव विकास ज्ञान साधनाश्रम तळेगाव शा पंत,आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर विचार प्रतिष्ठान नागपुर तर्फ नांदोरा (सेवाग्राम ) येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचा समारोप प्रसंगी प्रतिपादन केले. आचार्य रामकृष्ण अञे महाराज याच्या ७६ व्या जन्मोत्सव निमीत्य नांदोरा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळा अंतर्गत सुसंस्कार शिबीर चे ता. १ जुन २०२६ ला सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या समारोपीय कार्यक्रमाला ग्रामगीता अभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशराव आलवडकर, गुरुदेव प्रचारक आचार्य अञे महाराजाचे सेवक श्री विजय राव राउत सामाजिक कार्यकर्त सुरेद बेलुरकर . जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन जिकार.श्री विठ्ठलराव कारामोरे, श्री प्रभाकर देवतळे सौ,अर्चनाताई बटाले याच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या सुसंस्कार शिबीरात मुलाना सामुदायिक प्रार्थना,सामुदायिक ध्यान,ग्रामगीता वाचन पेटी,तबला भजन प्रशिक्षण, चिञकला,स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एक तरी औवी अनुभवावी ग्रामगीते ची योगा मनोरंजक खेळ बालगीत प्रशिक्षणाचे मुलाना मार्गदर्शन करण्यात आले.सुसंस्कार शिबीर हा आचार्य अञे महाराजाचा प्राण होता असे गौरवोद्गार श्री विजय राव राउत यानी व्यक्त केले वं.राष्ट्रसंता चे सर्व धर्म समभाव विचार गावाला एक विचार देउ शकतो असे प्रतिपादन श्री प्रकाश आलवडकर यानी केले कार्यक्रमाचे सुञसंचालन सुरेन्द्र बेलुरकर यानी केले तर आभार प्रदर्शन सौ,अर्चना ताई बटाले यानी केले,यावेळेस सरस्वी जय देवतळे देवाशु नांदे, हिमाशुं नांदे,अनुज बटाले, विहान बुरटकर, हिमांशू रहाटे,लक्ष सोनेकर,अंभग मोहदुरे,रुद्र कुकडे या मुलाचा सत्कार करण्यात आला.शिबीर यशस्वी करण्यासाठी सौ,अर्चना ताई बटाले, सौ,राखी कोल्हे,सौ,छायाताई सुरेश मोहदुरे,पुजा प्रविन बुरटकर, स्मिता महेश कुकडे यानी परिश्रम घेतले यावेळेस सर्व. सहभागी मुलाना व्ही व गीताच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.राष्ट्र वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.