🔥हाच तो इम्रान चा प्लॅनिग कुरुन खून करणारा हुलुकडुब्या दिनेश वरटकर याला या गुन्ह्यातून वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.🔥ह्याच त्या हॉटेल मधे बोलवुन केला या इम्रान चा गेम.
🔥इमरान खान हत्याप्रकरणात आरोपींना जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न? वर्धा बार असोसिएशनचा गंभीर आरोप; पोलिस तपासावरच उपस्थित केले मोठे प्रश्नचिन्ह
🔥प्रतिक तांबीया, पिंटू मोरोणे, दिनेश वडतकर व एका अनोळखी इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब अद्याप नोंदवले नसल्याचा दावा, निष्पक्ष व सखोल चौकशीसाठी वकील संघाचा जोरदार हल्लाबोल.
वर्धा -/ वर्ध्यातील गाजलेल्या इमरान खान असद खान हत्याप्रकरणात आता तपासाच्या दिशेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्धा बार असोसिएशन (जिल्हा वकील संघ) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात पोलिस तपासावर गंभीर आक्षेप नोंदवत प्रतिक तांबीया, पिंटू मोरोणे, दिनेश वडतकर तसेच एका अनोळखी इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी नावे सांगूनही त्यांचे जबाब नोंदवले गेले नसल्याचा दावा करत, काही आरोपींना जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार, वर्धा बारचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असद खान यांचे पुत्र इमरान खान असद खान यांच्यावर ३० जून २०२६ रोजी मोंटाना हॉटेल, वर्धा येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इमरान खान यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर ९ जुलै २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला होता. त्यानंतर वकील समुदायासह विविध सामाजिक स्तरातून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे.
बार असोसिएशनच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिंटू मोरोणे आणि दिनेश वडतकर यांच्यासोबत इमरान खान यांचे वाद सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, या दोघांनी प्रतिक तांबीया याला इमरान खान यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले होते आणि त्याच्याकडे चाकू असल्याची माहितीही त्यांना होती, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर या संपूर्ण प्रकरणात आणखी एका अनोळखी व्यक्तीचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी संबंधित व्यक्तींची नावे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्यांचे जबाब अद्याप नोंदवलेले नाहीत, असा आरोप वकील संघाने केला आहे. यामुळे तपासाची निष्पक्षता संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, काही आरोपींना जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही माहिती मृतकाचे वडील अॅड. असद खान यांनाही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
वर्धा बार असोसिएशनने आपल्या निवेदनात स्पष्ट भूमिका घेत प्रतिक तांबीया, पिंटू मोरोणे, दिनेश वडतकर आणि अन्य एका अनोळखी इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तातडीने नोंदवावेत, घटनाक्रमातील प्रत्येक पैलूची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
बार असोसिएशनसारख्या जबाबदार संस्थेने थेट पोलिस तपासावर प्रश्न उपस्थित केल्याने आता या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. निवेदनातील आरोपांची पोलिसांकडून सखोल शहानिशा केली जाणार का, तपासाचा विस्तार होणार का, तसेच निवेदनात नमूद केलेल्या सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जाणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या निवेदनामुळे इमरान खान हत्याप्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, न्यायासाठी लढणाऱ्या वकील समुदायाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.