🔥हाच तो सट्टा किंग पिपरानी चा भाचा पोलिस शिपाई अंकुश फेडरर🔥हाच तो यवतमाळ येथील कुप्रसिद्ध सट्टा किंग निलेश पिपरणी ज्याने पोलिस ना मॅनेज करून धुव्वाधार जुवा केला सुरू
🔥खाकीच्या आशीर्वादाने क्रिकेट सटोडिया निलेश पिपराणीचे यवतमाळात साम्राज्य; वसुली एजंट ते कोट्यवधींची काळी माया!
यवतमाळ प्रतिनिधी-/ कधी काळी राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या कर्जाची वसुली करणारा एक सामान्य वसुली एजंट आज शहरात कोट्यवधींच्या क्रिकेट सट्ट्याचा बेताज बादशहा बनला आहे. क्रिकेट सटोडिया निलेश पिपराणी याने अल्पावधीत उभारलेले अवैध साम्राज्य आणि त्याला यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने दिलेले कथित अभय, यामुळे शहरात कायद्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सामान्य नागरिकांना लुबाडून उभी केलेली ही माया आणि त्यातून फोफावलेले खंडणीसदृश वसुलीचे जाळे सध्या शहरभर तीव्र संतापाचा विषय ठरत आहे.
अवघ्या काही वर्षांपूर्वी बँकांच्या थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी दारोदार फिरणारा निलेश पिपराणी अचानक ‘हायप्रोफाईल’ क्रिकेट सटोडिया म्हणून समोर आला. आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि विविध लीगवर सट्टा चालवून त्याने अवैध पैशांचा डोंगर उभा केला. तरुणांना सट्ट्याच्या विळख्यात ओढणे, नंतर त्यांना कर्जबाजारी करून त्यांची घरे, दुकाने व मालमत्ता बळकावणे, असा पिपराणीचा गोरखधंदा यवतमाळात बिनदिक्कत सुरू असल्याची चर्चा आहे. या सट्टेबाजीतून त्याने कोट्यवधींची संपत्ती गोळा केली असून आलिशान वाहने, स्थावर मालमत्ता आणि महागड्या जीवनशैलीमुळे त्याच्या या अफाट मायेची चर्चा आता चौकाचौकांत सुरू आहे.
या संपूर्ण काळ्या साम्राज्यामागे खाकी वर्दीतील एका कर्मचाऱ्याची सक्रिय भागीदारी असल्याचा गंभीर आरोप होत आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला आणि पोलीस वर्तुळात ‘भिंगरी’ या टोपणनावाने ओळखला जाणारा अंकुश फेन्डर हा पिपराणीचा मुख्य पार्टनर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. पिपराणीच्या सट्टा अड्ड्यांवर कारवाई होऊ नये म्हणून खबरदारी घेणे, सट्ट्यात बुडालेल्या नागरिकांना दमदाटी करून वसुली करून देणे आणि बदल्यात लाखो रुपयांचे कमिशन लाटणे, अशी छुपी यंत्रणा या दोघांनी शहरात उभी केल्याचे बोलले जात आहे.
अंकुश फेन्डरच्या संशयास्पद कारभारामुळे आणि त्याच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासकीय स्तरावरून त्याची शहर पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली होती. मात्र, फेन्डर शहर पोलीस ठाण्याबाहेर गेला तर आपले सट्ट्याचे साम्राज्य अडचणीत येईल, या भीतीपोटी सटोडिया निलेश पिपराणी याने आपले संपूर्ण वजन आणि सट्ट्यातून कमावलेली काळी माया पणाला लावून ही बदली रोखल्याची जोरदार चर्चा पोलीस दलात सुरू आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सटोडियाच्या दबावाखाली किंवा पैशांच्या जोरावर एका पोलीस कर्मचाऱ्याची बदली थांबवली जाते, हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून सटोडिया निलेश पिपराणी व अंकुश फेन्डर यांची कथित जोडी उघडपणे वसुलीचे साम्राज्य चालवत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी डोळेझाक का करत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या दोघांच्या आर्थिक व्यवहारांची आणि बेनामी संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व अंमलबजावणी संचालनालयामार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यवतमाळकरांमधून जोर धरू लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फेन्डरवर कारवाई करत पिपराणीच्या सट्टा सिंडिकेटचा बीमोड करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(क्रमशः)