कोटंबा गावात स्वच्छता ही सेवा 2026 अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहीम..

0

🔥कोटंबा गावात स्वच्छता ही सेवा 2026 अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहीम.

सेलू -/ तालुक्यातील कोटंबा येथे केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर पासून स्वच्छता अभियान, विकसित भारत अश्या संकल्पनेवर कोटंबा ग्रामपंचायत द्वारे विविध उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या अभियानात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र सयुंक्त रित्या जनजागृती करण्यात आली. त्याच अनुषंगाने 1 ऑक्टोबर ला गावातील स्मशानभूमी परिसर, शाळा, अंगणवाडी परिसरात स्वच्छता करण्यात आली. आणि एक पेड़ माँ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…या अभियाना करिता ,माजी सरपंच रेणुका कोटंबकार, ग्रामविकास अधिकारी भगवान कंठाळे, मंडळ कृषी अधिकारी .आर. टी .राऊत , पाणलोट समिती सचिव राहुल कोसळकर ,WDT रोशन सावरकर, दिगांबर ऊमक, गणेश मोहकर ,अंगणवाडी सेविका शोभा चीडाम ,आरोग्य सेविका जयश्री महादुले ,आशा वैशाली रघाटांटे, मदतनीस वंदना मस्के, पूनम खाडे, ग्रामपंचायत कर्मचारी सूरज भोंगाडे स्वप्निल धरमूळ, अशोक कांबळे, नितेश डोळसकर, मुख्याध्यापक आंबटकर,शिक्षक, बचत गटातील सदस्य लीना ईरपाते ,शोभा मडावी, चंद्रकला तुमडाम,कविता डोंगरे, रुपाली डोंगरे, सविता सरोकार, कौशल कोसळकर , व सुधाकर खाडे, राजेश कोटंबकार, सुरेश डोंगरे, अंकुश करणाके ,मडावी, सौ गाठे या सर्व लोकानी अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता केली. यावेळी साध्या स्थिति पाहता ग्रामसेवक यांनी पाणी जपून वापरण्यास सांगितले .कृषी अधिकारी राऊत यांनी शेतकरी प्रमाणपत्र,अलनीनो चा प्रभाव, इ पीक पाहणी यासंदर्भात माहिती दिली. रेणुका कोटंबकार यांनी घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन बाबत माहिती सांगून सर्वांचे आभार मानले. शेवटी पाणलोट समिती कडून शाळेतील मुलाना खाऊचे वाटप करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!