भाजप पदाधिकारी चमडीचोर लुच्छा सतीश मानलवार विरूद्ध विशेष पोलीस महानिरिक्षकाकडे मागीतली दाद ,कोट्यवधींचे घोटाळे उघड केल्याने सुडाचा भडका

0

🔥हाच तो बाभुळगाव चा पांढरपेशा चमडीचोर लीडर सतीश उर्फ लुच्चा नालमवार, याने केला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

🔥भाजप पदाधिकारी चमडीचोर लुच्छा सतीश मानलवार विरूद्ध विशेष पोलीस महानिरिक्षकाकडे मागीतली दाद,कोट्यवधींचे घोटाळे उघड केल्याने सुडाचा भडका

🔥भाजप नेता चमडीचोर लुच्छा सतीश मानलवारच्या टोळीकडून आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न 

यवतमाळ ( प्रतिनिधी)-/ ग्रामपंचायतीमधील रेशन धान्य, मनरेगा आणि शासकीय निधीतील कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्याच्या रागातून ‘विश्व विजेता पत्रकार संघटने’चे अध्यक्ष व आरटीआय कार्यकर्ते रत्नपाल डोफे यांच्यावर पूर्वपरियोजित कट रचून प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपचे जिल्हा सचिव तथा राळेगाव विधानसभा प्रभारी सतीश मानलवार याच्या चिथावणीवरून व माजी सरपंचांच्या टोळीने लाठ्या-काठ्यांसह हा जातीवाचक हल्ला केल्याचा गंभीर आरोप डोफे यांनी केला आहे. तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर बिथरलेल्या भ्रष्ट साखळीने हा हल्ला घडवून आणला असून, घटनेला २४ तास उलटूनही बाभुळगाव पोलिसांनी एफआयआर नोंदवला नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कृष्णापूर (ता. बाभुळगाव) येथील सजग माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नपाल गोवर्धन डोफे यांनी गावातील विविध भ्रष्टाचाराची लक्तरे शासकीय पुराव्यांसह वेशीवर टांगली होती. तहसीलदारांनी अधिकृत चौकशीअंती रेशन धान्य घोटाळ्यात रंजना पाटील (नगराळे) हिला दोषी ठरवत १,०१,६०७ रुपयांचा दंड ठोठावून दुकान जप्तीचे आदेश दिले होते. तसेच लाचखोरी व गैरकृत्यांप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील जितेंद्र भानसे याच्या निलंबनाचे आदेश काढले होते. या दंडात्मक कारवायांमुळे धाबे दणाणलेल्या भ्रष्ट साखळीने डोफे यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तक्रारीत नमूद आहे.तक्रारदार डोफे यांनी दिलेल्या अंतिम लेखी तक्रारीनुसार, भाजप जिल्हा सचिव सतीश मानलवार हा या संपूर्ण गुन्हेगारी कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या राजकीय पाठबळावर माजी सरपंच सुभाष धोटे, सौ. माधवी धोटे, प्रमोद गेडेकर आणि निलंबित पोलीस पाटील जितेंद्र भानसे यांनी गावकऱ्यांना भीती दाखवून तसेच दारू पाजून भडकवले. दि. ०६ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री नियोजनबद्धरीत्या २५ ते ३० जणांच्या टोळीने रत्नपाल डोफे यांना घेरून जातीवाचक शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा हल्ला चढवला.

या कटात केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर भ्रष्टाचाराची कागदपत्रे दडपणाऱ्या ग्रामसेवक पी. एम. तालन, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी कोडापे, रोजगार सेवक निलेश झामरे आणि अंगणवाडीशी संबंधित लोकांचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी गावात घडलेल्या एका उपसरपंचाच्या हत्येचा संदर्भ देत, आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने आपल्या कुटुंबाच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचे डोफे यांनी स्पष्ट केले.

जीवघेण्या हल्ल्याची लेखी तक्रार अधिकृत पुराव्यांसह देऊनही बाभुळगाव पोलिसांनी अद्याप मुख्य संशयितांवर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागत, आरोपी सतीश मानलवारसह सर्व संबंधितांना तात्काळ बेड्या ठोकून कुटुंबाला कडक पोलीस संरक्षण देण्याची मागणी रत्नपाल डोफे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 बाभुळगाव,यवतमाळ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!