भ्रष्टाचाराने बरबटलेल्या चमडीचोर लुच्छा सतिष मानलवारची भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करा बाभुळगाव, कळंबच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्षांकडे थेट बंड!

0

🔥हाच तो भ्रष्टाचाराने बरबटलेल्या चमडीचोर लुच्छा सतिष मानलवारची भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करा बाभुळगाव, कळंबच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्षांकडे थेट बंड!

🔥अत्याचाराचा आरोप, चपलेने धुलाई अन् भ्रष्टाचाराची लक्तरे; कुख्यात सतिष मानलवारमुळे भाजपची अब्रू वेशीवर, पक्षातून हाकलण्याची एकमुखी मागणी!

​यवतमाळ -/ ​पक्षाच्या नावाखाली दहशतीचे साम्राज्य उभे करणारा आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला बाभुळगाव येथील सतिष मानलवार याच्या कृत्यांमुळे भाजपची प्रतिमा थेट वेशीवर टांगली गेली आहे. अल्पसंख्याक मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप, चपलेने झालेली धुलाई आणि भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे चव्हाट्यावर आल्याने बाभुळगाव व कळंब तालुक्यातील निष्ठावंत पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. पक्षाची निष्कलंक प्रतिमा डागाळणाऱ्या या सतिष मानलवारची भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी निर्वाणीची आणि एकमुखी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्याकडे थेट करण्यात आल्याने यवतमाळच्या राजकीय वर्तुळात प्रचंड भूकंप झाला आहे.

सत्ता आणि पदाचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरणारे आणि सामाजिक मूल्यांची पायमल्ली करणाऱ्यांना पाठीशी घालणे आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना असह्य झाले आहे. बाभुळगाव येथील चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार याच्या मनमानी, भ्रष्ट आणि चारित्र्यहीन कृत्यांमुळे भाजपच्या प्रतिमेचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत. या पार्श्वभूमीवर बाभुळगाव तसेच कळंब तालुक्यातील संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत थेट भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्याकडे धाव घेतली असून, मानलवारची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मानलवारवर तातडीने कारवाई न झाल्यास पक्षांतर्गत तीव्र असंतोष उफाळून येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

सतिष मानलवार हा बाभुळगाव व परिसरात भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू बनला असून, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या निकटवर्तीयाचा बुरखा पांघरून तो स्थानिक पातळीवर मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी उघडपणे केला आहे. मानलवार हा मंत्र्यांच्या मर्जीतील असल्याचा आव आणून शासकीय योजना, कंत्राटे आणि स्थानिक प्रशासकीय कामांमध्ये प्रचंड गैरव्यवहार करत असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या मंत्र्यांचेच या उपद्रवी नेत्याला छुपे संरक्षण मिळत असल्यामुळे पक्षाची बदनामी थेट उघड्यावर सुरू आहे, अशी खदखद तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. “पक्षाचा मंत्रीच एका भ्रष्ट व्यक्तीला पाठीशी घालून पक्षाची वाट लावत आहे का?” असा संतप्त सवाल आता पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात उपस्थित होत आहे.

सतिष मानलवार याच्या विकृत मनोवृत्तीची आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची अनेक धक्कादायक प्रकरणे आता स्थानिक पातळीवर उघडकीस येत आहेत. बाभुळगाव परिसरातील एका निष्पाप अल्पसंख्याक मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप मानलवारवर समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता, हे प्रकरण दाबण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी पीडित मुलीच्या हवालदील कुटुंबावर राजकीय दबाव आणून जीवे मारण्याच्या आणि उघड्यावर आणण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे बाभुळगावसह संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, अशा विकृत व्यक्तीला भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात स्थानच कसे मिळते, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

मानलवारचा तथाकथित ‘दबदबा’ हा केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जोरावर उभा असल्याचे नुकत्याच घडलेल्या एका खळबळजनक घटनेवरून स्पष्ट झाले आहे. यवतमाळ येथील राणाप्रताप गेट परिसरातील एका फ्लॅटमध्ये सतिष मानलवार याला एका संतप्त महिलेने चपलेने बेदम चोप दिल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. स्वतःच्या कृत्यांची वाच्यता होऊ नये आणि संबंधित महिलेने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा करू नये, यासाठी हा तथाकथित नेता त्या महिलेचे पाय धरून अक्षरशः गयावया करत माफी मागत असल्याचा प्रकार घडल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समोर आले आहे. या घटनेने मानलवारचे खरे ‘चारित्र्य’ जनतेसमोर नागडे केले आहे.

केवळ चारित्र्यहीन कृत्येच नव्हे, तर बेहिशेबी मालमत्ता आणि अनैतिक संबंधांचे जाळेही या भामट्याने विणल्याचे उघड झाले आहे. सतिष मानलवार याने कृष्णापूर परिसरात आपले दुसरे घर वसविल्याची माहितीही आता स्थानिक पातळीवर उघड झाली असून, भ्रष्टाचाराच्या काळ्या पैशातून त्याने ही ऐशोआराम उभारल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक समस्यांशी झुंजत असताना, दुसरीकडे पक्षाच्या नावावर दलाली करून स्वतःची काळी साम्राज्ये उभी करणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात आता पक्षातच बंडाचे निशाण फडकावले गेले आहे.

सतिष मानलवार याच्या या एकामागून एक उघडकीस येणाऱ्या कुकृत्यांमुळे बाभुळगाव व कळंब तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. “मानलवारच्या पापाचा घडा आता भरला असून, पक्षाने अशा बदमाशाला तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवला नाही, तर आगामी निवडणुकीत पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांना दिला आहे. आता भाजपचे जिल्हा नेतृत्व या बदफैली आणि भ्रष्ट नेत्यावर तात्काळ निलंबनाचा बडगा उगारून निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणार, की मंत्र्यांच्या दबावाखाली मानलवारला पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!