“साहसिक वृत्तपत्रातील बातमी सत्य घटनेवर”,- खासदार रामदासजी तडस
Byसाहसिक न्युज 24
कार्यालय प्रतिनिधी/वर्धा:
दैनिक साहसिक वृत्तपत्राला आज 15 वर्ष पूर्ण होत आहे दैनिक वृत्तपत्र सतत 15 वर्ष नियमित प्रकाशित होऊन त्यातील बातमी ही सत्य घटनेवर आधारित असते.कोणत्याही दबावाच्या बळी न पडता वृत्त प्रकाशित केल्या जाते असे विचार दैनिक साहसिक चया 15 व्या वर्धापन दीना प्रसंगी आपले विचार व्यक्त केले.दिनांक 21 जून 2022 रोजी दैनिक साहसिक कार्यालयात साहसिक कार्यालयात
साहसिक वृत्तपत्राचा 15 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.खासदार रामदासजी तडस हस्ते यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून केक कापण्यात आला.तसेच मान्यवरांचे हस्ते साहसिक पुरवणीचे विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन दिलीप गावंडे यांनी केले.आणि रेणूका कोटांबकर यांनी उपस्थिताचे आभार मानले.कार्यक्रमाला लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशमुख, पोलीस पाटील विजय कोल्हे,कविष कोतंबकर,प्रवीण लोणकर, अन्सार शेख, बामनोटे, सतराम आहुजा,अलका बावणे, प्रा.अनवर सिद्दीकी, राजकुमार कलवांणी, बाळा भाऊ माऊसकर,प्रमोद चोंदे,हिंतचीतक उपस्थित होते.ह्या कार्यक्रमासाठी भरत पाटील, शफी पठाण,अमोल ददगाल,सौ.काकपुरे,सीमा कांबळे,कू राणी डंभारे,अक्षय कन्नाके , सतीश अवचट इत्यादी सहकार्य केले.